पूजा चव्हाण आणि हिरेन मनसुख प्रकरणात एकच मोडस ऑपरेंडी, प्रवीण दरेकरांचा संशय

हिरेन मनसुख प्रकरणातही ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे का? | Pravin Darekar

पूजा चव्हाण आणि हिरेन मनसुख प्रकरणात एकच मोडस ऑपरेंडी, प्रवीण दरेकरांचा संशय
Pravin Darekar

मुंबई: पूजा चव्हाण आणि हिरेन मनसुख प्रकरणात पुरावे नष्ट करण्याची ठाकरे सरकारची मोडस ऑपरेंडी एकाचप्रकराची असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केला. हिरेन मनसुख (Hiren Mansukh) यांच्या हत्याप्रकरणात सचिन वाझे यांचा सहभाग असावा, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. विमला मनसुख यांनीही सचिन वाझे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सचिन वाझे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. (BJP leader Pravin Darekar on Mansukh hiren death case)

ते बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीविषयी संशय व्यक्त केला. पूजा चव्हाण प्रकरणातही ठाकरे सरकारने एफआयआर दाखल होऊन दिला नाही. त्यानंतर बराच वेळकाढूपणा केला. अखेर पुरावे नष्ट झाल्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे हिरेन मनसुख प्रकरणातही ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे का, असा संशय माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतो, असे दरेकर यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळे फासण्याची फडणवीसांची भाषा अयोग्य: राऊत

हिरेन मनसुख प्रकरणात मुंबई पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांनी बुधवारी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. पोलिसांचा तपास कसा चालतो, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासण्याची त्यांची भाषा अयोग्य आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबई आणि राज्यातील तपास यंत्रणांविषयी अशाप्रकारे शंका घेतल्यास त्यांचे मनोबल खच्ची होईल. तुमच्याकडे काही पुरावे असतील आणि ते पोलिसांकडून विचारात घेतले जात नसतील तर तुम्हाला आवाज उठवण्याची संधी आहे. मात्र, राज्याच्या विरोधी पक्षनेत्याने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या :

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

NIA चं पथक पोलीस आयुक्तांना भेटलं, तर सचिन वाझे तिसऱ्यांदा CP ऑफिसमध्ये

Mansukh Hiren Death Case | सचिन वाझेंच्या राजीनाम्यासाठी वाढता राजकीय दबाव, ठाकरे सरकारमध्येच दोन मतं

(BJP leader Pravin Darekar on Mansukh hiren death case)

Published On - 10:32 am, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI