AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mansukh Hiren Death Case | सचिन वाझेंच्या राजीनाम्यासाठी वाढता राजकीय दबाव, ठाकरे सरकारमध्येच दोन मतं

सचिन वाझे दोन दोन दिवसांपासून ठाण्याच्या राहत्या घरी आलेच नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. (Sachin Vaze Political Pressure Resignation)

Mansukh Hiren Death Case | सचिन वाझेंच्या राजीनाम्यासाठी वाढता राजकीय दबाव, ठाकरे सरकारमध्येच दोन मतं
sachin waze
| Updated on: Mar 10, 2021 | 9:21 AM
Share

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) वाझे संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. वाझेंच्या राजीनाम्यावरुन मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन मतप्रवाह असल्याची माहिती आहे. (Maharashtra Police Officer Sachin Vaze Political Pressure for Resignation)

सचिन वाझे दोन दिवसांपासून घरी नाही

सचिन वाझे दोन दोन दिवसांपासून ठाण्याच्या राहत्या घरी आलेच नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वाझेंचा राजीनामा आज घेण्यावरुन त्यांच्यावर राजकीय दबाव वाढत असल्याचं बोललं जातं. महाविकास आघाडी सरकारमध्येच सचिन वाझेंबद्दल दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एक गट वाझेंच्या राजीनाम्यावर ठाम आहे, तर दुसरा त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.

राठोडांचा राजीनामा, वाझेंचा का नाही, विरोधकांचा सवाल

दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात आजही सचिन वाझेंच्या राजीनाम्यावर विरोधक रान उठवणार आहेत. विरोधकांकडून सचिन वाझेंच्या अटकेची मागणी सातत्याने होत आहे. तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी संशय असलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तर सचिन वाझेंचा राजीनामा का घेत नाही, असा थेट सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

सचिन वाझे पोलीस आयुक्तांच्या भेटीला

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर सचिन वाझे काल तिसऱ्यांना पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले होते. तिथे त्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतल्याचं कळतंय. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आता वेग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“गाडी माझ्याकडे होती हा आरोप आहे का?”

या भेटीनंतर ते बाहेर पडले असता त्यांनी माध्यमांनी काही प्रश्न विचारले. त्यात मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं असता, गाडी माझ्याकडे होती किंवा नव्हती यात आरोप काय आहे? असा सवाल त्यांनी केला. तसंच हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोप आपण वाचून त्यावर प्रतिक्रिया देऊ, असंही वाझे यांनी म्हटलंय. (Maharashtra Police Officer Sachin Vaze Political Pressure for Resignation)

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ATS करत आहे. त्यासंदर्भात मनसुख हिरेन यांचा मृतदेह त्या ठिकाणी सापडला होता त्या मुंब्रा रेतीबंदर खाडीवर ATS ची टीम काल गेली होती.

सचिन वाझेंच्या अटकेची आशिष शेलारांची मागणी, पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

NIA चं पथक पोलीस आयुक्तांना भेटलं, तर सचिन वाझे तिसऱ्यांदा CP ऑफिसमध्ये

(Maharashtra Police Officer Sachin Vaze Political Pressure for Resignation)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.