AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रधानांचा राजीनामा तर झाला, आता ठाकरेंचे आंदोलन होणार की नाही? उद्धव ठाकरेंनी थेट सांगिलं!

मुंबईत उद्या 26 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेने विद्यार्थांच्या मागण्यांना पाठींबा देण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले. आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हा मोर्चा होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रधानांचा राजीनामा तर झाला, आता ठाकरेंचे आंदोलन होणार की नाही? उद्धव ठाकरेंनी थेट सांगिलं!
Thackeray BrothersImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 5:00 PM
Share

दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी लाखो विद्यार्थी एकवटले होते. कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाला. देशाच्या वेगवेगळ्या भागात आंदोलन पुकारण्यात आले होते. मुंबईत उद्या 26 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेने मोर्चाचे आयोजन केले. पण आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हा मार्चा काढण्यात येणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

उद्या मोर्चा होणार की नाही?

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे उद्याच्या मोर्चाविषयी म्हणाले की, ‘उद्याचा मोर्चा होणार आहे. उद्या मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला काढतो. पण हे जाहीर झाल्यावर अमित आणि आदित्यला लोकांनी मेसेज केला. आणि उद्या आणि आजही येणार आहे. उद्या ही ताकद मुंबईतून दाखवली पाहिजे. उद्याचा मोर्चा जो आहे, ते राज सांगेल.’

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे पुढे मोर्चाविषयी बोलताना म्हणाले की, ‘शिवाजी पार्क मैदानात वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ असेल. तिथेच जमणार आहोत. तरुणाईचा खूप मोठा विजय आहे. एका वाक्यात सांगायचं तर जेनजीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला जमिनीवर आणलं आहे. मला वाटतं हा खूप मोठा विजय तरुणांचा आहे. त्यात दीपकेंचा मोठा वाटा आहे. कोणत्याही गोष्टीला मस्तवालं उत्तर देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढं मोठं आंदोलन देशात उभं राहिलं. त्याचा जल्लोष झाला पाहिजे.’

पुढे ते म्हणाले, ‘मी कालच म्हटलं होतं हा राग प्रधानावरून पंतप्रधानावर गेला आहे. यापुढचे काही निर्णय दीपके घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यांनीच निर्णय घ्यावा. त्यांनीच या गोष्टी सुरू केल्या आहेत. आमचा पाठिंबा असेल.’

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत...
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
रात्रभर झोप नव्हती... अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...