AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ममता जिहादी, जिवंत किंवा मृत पकडा आणि एक कोटी मिळवा”

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘जिवंत किंवा मृत’ पकडण्यावर बक्षीस देण्याबाबतचं एक पत्र समोर आलं आहे.

“ममता जिहादी, जिवंत किंवा मृत पकडा आणि एक कोटी मिळवा”
| Updated on: Jun 10, 2019 | 11:06 AM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकीय वाद हा दिवसेंदिवस आणखी चिघळत आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘जिवंत किंवा मृत’ पकडण्यावर बक्षीस देण्याबाबतचं एक पत्र समोर आलं आहे. कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या अपरुपा पोद्दार यांना पोस्टाने हे पत्र पाठवण्यात आलं. हे पत्र मिळताच पोद्दार यांनी याबाबत सीरमपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या पत्रात ममता बॅनर्जी यांना जिवंत किंवा मृत पकडल्यास एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.

त्याशिवाय, या पत्रात ममता यांना ‘राक्षसी’ आणि ‘जिहादी’ म्हटलं गेलं. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या पत्रावर राजीव किल्ला नामक व्यक्तीची स्वाक्षरी आहे. यावर एक पत्ता आणि तीन फोन क्रमांक देण्यात आले आहेत. या पत्रानुसार, ममता बॅनर्जी यांना पकडणाऱ्यांना एक कोटी रुपये देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. पोलीस हे पत्र पाठवणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

ममता बॅनर्जी भाजपच्या निशाण्यावर

लोकसभा निवडणुकांपासून टीएमसी आणि भाजपमध्ये सुरु झालेला वाद हा अज्ञापही थांबलेला नाही. निवडणूक प्रचारादरम्या सध्याचे गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचार रॅलीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता. त्यावेळी टीएमसली कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली होती, जाळपोळही करण्यात आली होती. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली.

‘जय श्री राम’वरुन वाद

भाजप कार्यकर्त्यांच्या ‘जय श्री राम’ या जयघोषावरुनही पश्चिम बंगालचं राजकारण तापलं. ‘जय श्री राम’ म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर ममता बॅनर्जी धावून गेल्या. तर दुसरीकडे ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्यामुळे काही लोकांना अटकही करण्यात आली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ममता यांना ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला.

ममता बॅनर्जी या हिरण्यपश्यपुच्या कुटुंबातील

गेल्याच आठवड्यात बाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी ममता बॅनर्जी या हिरण्यपश्यपुच्या कुटुंबातील असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ममता यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांच्याशी केली. किम जोंग उन प्रमाणे ममता यादेखील क्रूरपणे वागत असल्याचं गिरीराज म्हणाले होते.

लंकिनीसोबत ममता बॅनर्जी यांची तुलना

भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना लंकिनीसोबत केली होती. “ममता बॅनर्जी या वाईट आहेत. ज्याप्रकारे हनुमान यांना लंकिनीने लंकेत जाण्यापासून रोखलं होतं, त्याचप्रकारे ममता यांनी मोदी-योगी सारख्या राम आणि हनुमान यांना पश्चिम बंगालमध्ये येण्यापासून थांबवलं होतं. मात्र, योगींसारख्या हनुमानाला थांबवण्याची क्षमता कुणात नाही. आता लंकिनीचा नाश होईल आणि तिथेही (पश्चिम बंगाल) विभीषणचं राज्य असेल”, असं सुरेंद्र सिंह म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

‘चाणक्य’ प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जींसाठी काम करणार

भाजप ममतांना ‘जय श्री राम’चे 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार

ममता हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील? साक्षी महाराज पुन्हा बरळले

VIDEO : ‘जय श्री राम’च्या घोषणेमुळे ममता बॅनर्जी चिडल्या, गाडीतून उतरुन लोकांवर धावल्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.