राज्यात कुठे कुठे मतदानावर बहिष्कार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी नागरी प्रश्न प्रलंबित असल्याने मतदारांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, तर काही ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील सुनेगाव येथेही असाच प्रकार पाहायला मिळाला. या ठिकाणी नागरिकांनी मतदानावर पूर्ण बहिष्कार  टाकला आहे. या गावात मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत एकाही […]

राज्यात कुठे कुठे मतदानावर बहिष्कार?
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:06 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी नागरी प्रश्न प्रलंबित असल्याने मतदारांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, तर काही ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली.

लातूर

जिल्ह्यातील सुनेगाव येथेही असाच प्रकार पाहायला मिळाला. या ठिकाणी नागरिकांनी मतदानावर पूर्ण बहिष्कार  टाकला आहे. या गावात मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत एकाही नागरिकाने मतदान केले नाही. गावाला रस्ता नाही, बस येत नाही. त्यामुळे नागरिकांना अत्यंत हाल अपेष्टांचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे सुनेगाव शेन्द्रीच्या गावकऱ्यांनी बहिष्काराचे हत्यार उपसले. सुनेगाव येथे तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी 2-3 वेळा गावात भेट दिली. तसेच स्थानिकांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा उपयोग झाला नाही. साधारण 1200 लोकसंख्येच्या या गावात एकूण 558 मतदार आहेत. मात्र नागरी प्रश्न जैसे थे असल्याने त्यांनी मतदानावरच बहिष्कार टाकला.

सोलापूर

अक्कलकोट तालुक्यातही 10 गावांमध्ये कोणीही मतदान केले नाही. आळगी, गुड्डेवाडी, अंकलगीसह 10 गावांनी पाण्याच्या प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकला. येथील गावकऱ्यांनी उजनी धरणातून हिळी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

बीड

बीडमधील 2 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. बीड तालुक्याच्या कुंभारी गावातील नागरिकांनी गाव पुनर्वसन आणि तळ्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याने मतदानास नकार दिला. बीड तालुक्यातील सौंदाना गावाने स्वातंत्र्यापासून रस्ता न झाल्याच्या रागातून मतदानावर बहिष्कार टाकला.

उस्मानाबाद

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तर थेट अपक्ष उमेदवार शंकर गायकवाड यांनीच मतदानावर बहिष्कार टाकला. गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने, गावकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील काही भाग सोलापूर जिल्ह्यात मोडतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी येथील ग्रामस्थांनी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला.

जालना

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या जालना लोकसभा मतदारसंघातही 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला, तर इतर 40 गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली. जालना जिल्ह्यातील बापकळ गावातील सर्वच मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. हे गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदार क्षेत्रात येते. 1250 लोकसंख्या असलेले या गावात 747 मतदार आहेत. बापकळ या गावाचा परभणी लोकसभा मतदार संघात समावेश होतो. आज सकाळपासून या गावातील एकाही गावकऱ्याने मतदान केलं नाही. गावाजवळील हातवन पाणी प्रकल्प रखडल्याने या गावातील गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पाणी प्रकल्प रखडल्याने गावात पाणीटंचाई असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

मुंबई 

महाराष्ट्रातील पारंपारिक मच्छीमारांचा पर्शियन नेट मासेमारीला, एल.ई.डी लाईटद्वारे होत असलेल्या मासेमारीला तीव्र विरोध आहे. यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कोकणातील मासेमारी करणाऱ्या समुदायानेही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

नवी मुंबई

गेल्या 30 वर्षांपासून नवी मुंबईमधील विस्तारीत गावठाणाचा आणि घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. कोणताही राजकीय पक्ष हे प्रश्न सोडवण्यास तयार नाही. याचा फक्त राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप करत येथील 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

कोल्हापूर 

कोल्हापूरच्या धामणी खोऱ्यातील 30 हजार मतदारांनी पाण्याच्या प्रश्नावर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. जिल्ह्यातील तब्बल 60 ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव केला. तसेच राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीही केली.

भिवंडी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कल्याण पश्चिममधील 5 सोसायटींनी आपले नागरी प्रश्न सुटावे यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. वारंवार पाठपुरावा करुनही रस्त्याचा प्रश्न न सुटल्याने स्थानिक नागरिकांनी हा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून याची माहितीही दिली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला नागरिकांच्या प्रश्नावर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच नागरिकांना मतदानावरील बहिष्कारापासून परावृत्त करण्यास सांगितले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.