Naseem Khan | काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले : नसीम खान

मुस्लीम समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा देणाऱ्या परंतु समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करुन सत्तेचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एमआयएम साथ देत असते.

Naseem Khan | काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले : नसीम खान
काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लीमांना दिलेले आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 12:03 AM

मुंबई : काँग्रेस आघाडी सरकारने 2014 साली मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात 5 टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हाय कोर्टानेही मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले? फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही? असा घणाघाती आरोप माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ मोहम्मद नसीम खान यांनी केला आहे.

भाजपा व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू

एमआयएमच्या असादुद्दीन ओवेसी यांचा समाचार घेताना नसीम खान म्हणाले की, मी अल्पसंख्याक मंत्री असताना मराठा समाजाबरोबरच मुस्लीम समाजालाही आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर भाजपा सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. पाच वर्ष काँग्रेस पक्ष मुस्लीम आरक्षणासाठी फडणवीस सरकारशी संघर्ष करत होता त्यावेळी एमआयएमने या आरक्षणाबद्दल तोंडातून एक शब्द काढला नाही.

उलट एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी मुस्लिमांना आरक्षण न देणाऱ्या फडणवीस सरकारची सातत्याने मदतच केली. निवडणूक आल्यावरच एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणुक संपली की यांना आरक्षण आठवत नाही, असा टोलाही नसीम खान यांनी लगावला. भाजपा व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे नसीम खान म्हणाले.

एमआयएमची भूमिका ही नेहमीच भाजपाला अनुकूल

मुस्लीम समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा देणाऱ्या परंतु समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करुन सत्तेचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एमआयएम साथ देत असते. एमआयएमला राज्यातील मुस्लीम समाज थारा देत नाही. एमआयएमची भूमिका ही नेहमीच भाजपाला अनुकूल राहिली आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, येथे येऊन औवेसींनी मुस्लीम समाजाला भडकावण्याचे प्रयत्न करुन नयेत. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबध्द आहे.

निवडणुकींच्या तोंडावर ओवेसींना आरक्षण आठवते

मुंबई महानगरपालिका आणि राज्यभरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींना मुस्लीमांचा विकास आणि आरक्षण आठवले. आरक्षणावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या असदुद्दीन औवेसी यांनी व त्याच्या एमआयएम पक्षाने मुस्लीम समाजासाठी काय केले ? या हिशोब द्यावा असा सवाल करून महाराष्ट्रातील मुस्लीम समाज सूज्ञ असून एमआयएमला पुरता ओळखून आहे त्यांना थारा देणार नाही, असेही नसीम खान म्हणाले. (The reservation given to Muslims by the Congress-led government was stuck by the Fadnavis government)

इतर बातम्या

ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अनिल परबांशी संबंधित व्यक्तीवर किरीट सोमय्यांचा 100 कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप, दोन दिवसांत उघड करणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.