…तर धनंजय मुंडेंसारखे अनेक मंत्री मी काढून टाकेन, करुणा मुंडे यांचा इशारा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष तयारी करत असताना आता करुणा मुंडे याही त्यांचा पक्ष स्वराज्य शक्ती सेनेला घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे विविध पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात आठ-आठ पक्ष असून महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि गरिबांना न्याय मिळत नाही. त्यात आता करुणा मुंडे यांनी त्यांचा पक्ष स्वराज्य शक्ती सेनेला घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात उतरायचे ठरवले आहे. यावेळी करुणा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. मतदारांना मी शपथ घेऊन सांगते, फक्त पाच वर्षांसाठी मला संधी द्या आम्ही बदल घडवून आणू असे यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले की कोणालाही मतदान केलं तर जिंकणार हेच आहेत, राहुल गांधींनी कसे मुद्दे काढले. मतदार याद्यांमध्ये मृत व्यक्तीचं नाव आहे. एकाच घरात चाळीस-पन्नास मतदारांचे नावं आहेत. शिवाय एकाच घरातील दोन उमेदवार वेगळ्या पक्षात असल्याने मतदान कोणालाही केले तरी जिंकणार हेच.एकाच घरात दोन दोन पक्ष आहेत. भाऊ राष्ट्रवादी तर बहीण भाजपमध्ये आहे. नवरा भाजपमध्ये तर बायको राष्ट्रवादीमध्ये आहे. तुमची सत्ता आली तर आमचं झाकून ठेवा, आमची सत्ता आली तर तुमचं झाकून ठेवू असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आपला महाराष्ट्र 70 – 80 वर्ष मागे गेला असल्याने आम्ही स्थानिक प्रश्नावर निवडणूक लढवणार आहोत असे करूणा मुंडे यांनी म्हटले आहे.
तर मी तोपर्यंत निवडणूक होऊ दिली नसती
कोणालाही मतदान केलं तर जिंकणार हेच आहेत, राहुल गांधींनी कसे मुद्दे काढले. मृत व्यक्तीचं नाव आहे. एकाच घरात चाळीस-पन्नास मतदारांचे नाव आहेत. शिवाय एकाच घरातील दोन उमेदवार वेगळ्या पक्षात असल्याने मतदान कोणालाही केले तरी जिंकणार हेच.मतदारांना माझे आवाहन आहे. फक्त पाच वर्षा मला संधी द्या आम्ही बदल घडवून आणू. मी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार नाही. मात्र पदवीधर निवडणूक लढवणार आहे, मात्र त्याला अजून वेळ असल्याने आपण यावर नंतर बोलु असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. माझ्या पक्षाची जर ताकद चांगली राहिली असती तर मी निवडणूक यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका होऊ दिल्या नसत्या असाही दावा त्यांनी यावेळी केला.
…तर मुलाबाळांमध्ये राहिले असते
डॉ. संपदा मुंडे प्रकरणात प्रमाणिक तपास होत नाही, एका खासदाराचा नाव यात येत आहे, मात्र या प्रकरणातील महिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलेले नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बरेच धागेदोरे उघडू शकतात. सामान्य नागरिकांना आणि महिलांना जर योग्य न्याय मिळाला असता तर मी राजकारणात आले नसते. मुलाबाळांमध्ये मुंबईला राहिले असते असे करुणा मुंडे यांनी सांगितले. करुणा मुंडे यांचा इशारा
मुंडे घराण्याच्या सुनेला पक्ष काढावा लागला,आमच्या घराण्यात एकाच दिवसात दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती.महिलांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आमच्या घरातील एक मंत्रीपद काढून टाकले. जर आमच्या पक्षाला योग्य ताकद मिळाली तर धनंजय मुंडे सारखे अनेक मंत्री मी पदावरून काढून टाकणार असा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला आहे.
