जे वातावरण देशात आहे तेच महाराष्ट्रात, इथेही भाजप निवडून येईल: देवेंद्र फडणवीस

ही निवडणूक सरकारला शॉक देण्याची निवडणूक आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. | Devendra Fadnavis

  • राजीव गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड
  • Published On - 18:34 PM, 23 Nov 2020
There wave of BJP in country In Maharashtra same will be happen says Devendra Fadnavis

नांदेड: जे वातावरण देशात आहे तेच महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. मराठवाडा आणि विदर्भाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी भाजप उमेदवाराला निवडून द्या. मराठवाडा/विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतलाय, राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावर आक्षेप तरी घेतला का?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. (BJp will win in graduate constituency election 2020)

ते सोमवारी नांदेडमधील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिल, मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवरून महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले. आपला मित्र बेईमान निघाला. मित्राने असंगाशी संग केला, अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.

लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिलं आली. पण जी वीज वापरलीच नाही तर त्याचे बिल कसे भरणार? त्यामुळे ही निवडणूक सरकारला शॉक देण्याची निवडणूक आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

‘हायकोर्टात कमावलं ते सुप्रीम कोर्टात गमावलं’

आमच्या सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. पण या सरकारला ते टिकवता आले नाही. या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. आपण जे हायकोर्टात कमावले ते सुप्रीम कोर्टात गमावले. राज्य सरकारने मराठा आणि ओबीस समाजाला समोरासमोर उभे करु नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

भाजप, महाविकास आघाडी, मनसेच्या उमेदवारांविरोधात तक्रार

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या भाजप, मनसे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार पुणेस्थित वकील अभिषेक हरिदास यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तक्रारीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील या तीन उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो : दानवे

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, अमावास्येचा फेरा; संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस

(BJp will win in graduate constituency election 2020)