तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो : दानवे

कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत, अशी टीका रावसाहेब दानवेंनी केली

  • प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी
  • Published On - 17:22 PM, 23 Nov 2020

परभणी : येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो, अशी फटकेबाजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त ते परभणीत बोलत होते. (Raosaheb Danve reiterates BJP will be back in Maharashtra Government)

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ तीन वेळेस भाजपकडे होता, पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला. नाहीतर हा मतदारसंघ आपल्या हातून जात नव्हता. याचा बदला या निवडणुकीत घेऊन भाजपचा उमेदवार पुन्हा निवडून आणायचा आहे. गेल्या काही वर्षात आमदाराने एकही प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल.

आपल्याला एकाचे पाच आणि पाचाचे पन्नास करायचे. कुटुंब नियोजन करायचं का? पक्षाचं नाही करायचं. पक्ष वाढला पाहिजे. विधानसभा लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिली निवडणूक आहे, आपल्याला यश मिळालं पाहिजे. असं सांगत कार्यकर्त्यांना बूथनिहाय पुन्हा कामं जोमाने करण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं.

दरेकरांकडून सरकार बदलण्याचा दावा

“राज्यातील जनता आज त्रस्त आहे. उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल. तुमच्या एक वर्षाच्या सरकारला जनता त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील” असं मोठं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दोनच दिवसांपूर्वी केलं होतं. (Raosaheb Danve reiterates BJP will be back in Maharashtra Government)

संबंधित बातम्या :

पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार, प्रवीण दरेकरांचं मोठं विधान

राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत, दानवेंचं ठाकरेंना उत्तर

दानवे प्रीतमताईंचा फॉर्म भरायला आले, त्या जिंकल्या, माझ्यावेळी आले नाहीत, मी हरले : पंकजा

(Raosaheb Danve reiterates BJP will be back in Maharashtra Government)