AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022 Ward No 19 | शिवसेनेच्या अस्तित्वालाच आव्हान, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कोणाच्या हाती धनुष्यबाण?

TMC Election 2022 Ward No 19 | यंदाची ठाणे महापालिकेची निवडणूक रंजक होणार आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर शिवेसेनेची मोठी सत्वपरीक्षा होणार आहे.

TMC Election 2022 Ward No 19 | शिवसेनेच्या अस्तित्वालाच आव्हान, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कोणाच्या हाती धनुष्यबाण?
शिवसेनेपुढे मोठे आव्हान Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 5:23 PM
Share

TMC Election 2022 Ward No 19 | राज्यात गेल्या महिन्यातील नाट्यमय घडामोडीनंतर सत्तांतर (Change of Government) घडून आले. शिंदे गटासह भाजप सत्तेत सहभागी झाला आहे. ठाणे हा शिवसेनेचा (Shiv Sena) बाल्लेकिल्ला होता. मात्र शिवसेनाला ठाण्यातूनच पहिला सुरुंग लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांची मोट बांधत राज्यात सत्तांतर घडवून आणले. या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहे. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्ष करत आहेत. ठाणे महापालिकेत (TMC Election 2022) प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी लगबग झाल्यानंतर आता तिकीटासाठी इच्छुकांची फिल्डिंग लागली आहे. पक्ष नेते ही सक्रिय झाले असून जास्तीत जास्त नगरसेवक (Corporator) निवडून आणण्यासाठी पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना आणि शिंदे सेना यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीने ही निवडणुकीसाठी कंबर कसली असून मनसे, काँग्रेस आणि अपक्ष ही या निवडणुकीत दावेदार आहेत.

ठाण्यातील (Thane) इच्छुक नगरसेवकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane municipal corporation election 2022) वॉर्ड क्रमांक 19 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन दिली आहेत. तर काही उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तसेच वॉर्डात ही भेटीगाठी सुरु झाल्या असून निवडून दिल्यावर नागरी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्या जात आहे. कॉर्नर बैठकांचे सत्र ही सुरु झाले आहे. निवडणुकीचा खर्चासहित इतर गणितं मांडण्यात येत असून निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

ठाणे महापालिका आरक्षण

ठाणे महापालिका निवडणुकीत एकूण 142 जागांवर निवडणूक होत आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या एकूण 10 जागा असून त्यातील 5 जागांवर महिला उमेदवार नशीब आजमावतील. अनुसूचित जमातीसाठी 3 जागा असून त्यातील 2 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण 15 जागा राखीव असून त्यातील 8 जागांवर महिला उमेदवार नशीब आजमावतील. तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी एकूण 114 जागा असून त्यातील 56 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या निवडणुकीत सर्व मिळून एकूण 71 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.

आरक्षण सोडतनुसार  बदल

वार्ड क्रमांक 19 (अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला वार्ड क्रमांक 19(ब) सर्वसाधारण वार्ड क्रमांक 19 (क) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 19 लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 35931 अ.जा. – 2738 अ. ज. – 616

प्रभागात समाविष्ट परिसर

के. विला (काही भाग), पोलीस कॉलनी, क्रांतीनगर, चरई, गिता सोसायटी, आंबेडकर नगर, मनोहरपाडा,जोगिला मार्केट परिसर, महात्मा फुले नगर आदी परिसराचा या प्रभागात समावेश होतो.

विजयी उमेदवार, वार्ड क्रमांक 19 (2017)

प्रभाग क्रमांक 19 (अ) – मीनल संख्ये (शिवसेना) प्रभाग क्रमांक 19 (ब) – नम्रता फाटक (शिवसेना) प्रभाग क्रमांक 19 (क) – विकास रेपाळे (शिवसेना) प्रभाग क्रमांक 19 (ड) – नरेश म्हस्के (शिवसेना)

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर

Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?