ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना 13 हजारांचा दंड माफ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं होतं. याबाबत त्यांच्यावर नियमानुसार 13 हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. मात्र हा दंड मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने माफ केला आहे. हा दंड बेकायदेशीरपणे माफ करण्यात आला असल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांचं म्हणणं आहे. एमएच सीपी 0037 आणि […]

ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना 13 हजारांचा दंड माफ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं होतं. याबाबत त्यांच्यावर नियमानुसार 13 हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. मात्र हा दंड मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने माफ केला आहे. हा दंड बेकायदेशीरपणे माफ करण्यात आला असल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांचं म्हणणं आहे.

एमएच सीपी 0037 आणि एमएच सीपी 0038 या दोन गाड्या आहेत. मुख्यमंत्री जेव्हा कुठे जातात, तेव्हा त्यांच्यासाठी वाहतूक थांबवली जात असते. मात्र यावेळी त्यांचे चालक सुसाट गाडी चालवत असतात. मुंबईत गाडी चालवताना वेग मर्यादा आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्या गाडीचा वेग नियम मोडणारा असतो.

मुंबईत ट्राफिक विभागाने अनेक ठिकानी सीसीटीव्ही बसवले आहेत. जी गाडी वेग मर्यादा ओलांडले, त्या गाडीचे नंबर या कॅमेऱ्यात कैद होत असतात. यानंतर गाडी मालकाला ई-चलन जात असत. मुख्यमंत्री यांच्या गाडीबाबतही ई-चलन निघालं आहे. मात्र, हे पैसे मुख्यमंत्री कार्यालयातून वसूल करण्यात आले नाहीत. हे पैसे माफ करण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांना मोठी सुरक्षा असते. ते नियम तोडू शकतात, असे वाहतूक विभागाचं म्हणणं आहे. तसं त्यांनी आरटीआयमध्ये कळवलं आहे .

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांना वाहतूक नियमात सवलत आहे. पण टीव्ही 9 मराठीने माहिती मिळवली असता, केवळ पोलीस, अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्यांना सूट आहे. मात्र, तेही त्यांचा सायरन वाजत असेल तर.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळे कायदे का, असा सवाल आता माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी उपस्थित केला आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.