…तर उदयनराजे भोसले रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढतील!

...तर उदयनराजे भोसले रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढतील!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली नाही, तर त्यांना माझ्या कोट्यातून लोकसभेची उमेदवारी देईन. आमच्यात तशी बोलणी झालीय, असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय समजाकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘एन्काऊंटर’ या मुलाखत विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

रामदास आठवले नेमके काय म्हणाले?

“शिवसेना आणि भाजपची युती झाली, तर मला रिपाइंसाठी दोन जागा हव्या आहेत. एक शिवसेनेचे विद्यमान खादार राहुल शेवाळे यांची जागा मला हवीय, त्या बदल्यात शिवसेनेला पालघरची जागा किंवा दुसरी कोणती हवी असेल तर दिली जाईल. आणि दुसरी साताऱ्याची जागा हवीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर उदयनराजेंना उमेदवारी दिली नाही, तर मी त्यांना माझ्या कोट्यातून लोकसभेची जागा देणार आहे. आमच्यात तशी बोलणी झालीय.”, असे रामदास आठवले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.

उदयनराजे भोसले हे सध्या साताऱ्यातून राष्ट्रवादीचे खासदार आहेत. लोकांमध्ये मिळून-मिसळून राहण्यामुळे उदयनराजे हे साताऱ्यातील जनतेच्या पसंतीचे खासदार मानले जातात. शिवाय, उदयनराजेंना राजघराण्याचे वलयसुद्धा आहे. अत्यंत दिलखुलास आणि मनमोकळे व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यासह देशाच्या राजकारणात त्यांची ओळख आहे.

2014 साली सातारा लोकसभा मतदारसंघात काय स्थिती होती?

सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे खासदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 5 लाख 22 हजार मते मिळाली होती. तर भाजप, शिवसेना आणि आरपीआय या आघाडीने ही जागा आरपीआयला बहाल केली होती. त्यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना नावापुरते उभं करण्यात आलं. त्यांना 71 हजार मते मिळाली होती.

2009 मध्ये उदयनराजे यांना टक्कर देणारे भाजपचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना 2014  मध्ये अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. त्यांना 1 लाख 56 हजार मते मिळाली होती. 2009 मध्ये त्यांना 2 लाख 35 हजार मते मिळाली होती. ‘आप’चे उमेदवार राजेंद्र चोरगे यांना 82 हजार मतदान झालं. या उमेदवारांसह 2014 च्या निवडणुकीत अजून 12 अपक्षांनी आपलं नशीब आजमावलं होतं.

उदयनराजेंना टक्कर देऊ शकणारे प्रमुख विरोधक कोण?

कोणत्याही व्यक्तीला आपलंसं करण्याचं मोठ कौशल्य उदयनराजेंमध्ये आहे. जात धर्म न मानता सर्व सामान्य लोकांना एकत्र घेऊन जाणार व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सामान्यातल्या सामान्य माणूस जलमंदिर पॅलेसला शासकीय अथवा कोणतीही तक्रार घेऊन गेला तर त्याला तात्काळ न्यायनिवाड्याचं करण्याचं काम उदयनराजे करतात.

या गोष्टींसोबतच उदयनराजेंच्या काही नकारात्मक बाजूही आहेत. कोणत्याही गोष्टीवर पटकण रिअॅक्ट होणे, कार्यकर्ता अथवा सामान्य व्यक्तीच्या सांगण्यावरुन माहिती न घेता समोरच्या व्यक्तीवर अचानक अॅग्रेसीव होणे ही त्यांची नकारात्मक बाजू आहे.

सातारा लोकसभा : राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, तरीही राजे साताऱ्यातून लढणारच!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI