Uddhav Thackeray : एकच काम करा, नोंदणी, नोंदणी, नोंदणी, 50 लाख प्रतिज्ञापत्रांचा टप्पा पार करा; उद्धव ठाकरेंचा आदेश

त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं आणि मतं मिळवावं. पण ही हिंमत यांच्यात नाही. कारण हे खरे मर्दच नाहीत. दुसऱ्यांचा पक्ष चोरणं, दुसऱ्याचं चिन्हं चोरण्याचा प्रयत्न करणं ते चोरलं जाऊच शकत नाहीत.

Uddhav Thackeray : एकच काम करा, नोंदणी, नोंदणी, नोंदणी, 50 लाख प्रतिज्ञापत्रांचा टप्पा पार करा; उद्धव ठाकरेंचा आदेश
उद्धव ठाकरे Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 8:57 PM

मुंबई –  शिंदे गटात कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. आज रामदास कदम यांनी जाहीररित्या आम्ही बंड का केलं हे सांगितलं.  त्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. कोण काय करतंय कोण रडतंय त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आपल्या पक्षासाठी फक्त नोंदणी वाढवा असा संदेश दिला.  त्यानंतर “पण जेव्हा भाजपला (BJP) कळेल हे काडीच्या कामाचे नाही तेव्हा भाजप त्यांना फेकून देईन. तुम्हाला एकच काम देतोय. नोंदणी नोंदणी आणि नोंदणी. याच्यापलिकडे तुम्ही काही पाहू नका. राजकारणात (Politics) कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे काम दिलं ते आठ दिवसात पूर्ण करा. जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम सहानुभूती आहे. तीव्र राग आहे. त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा. ही आलेली संधी आहे. एकदा आपण 50 लाखाचा टप्पा पार केला तर नोंदणीचे गठ्ठेचे गठ्ठे घेऊन या. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याती मी दौरे करणार आहे. गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांसोबत घेऊन काम करा असा आदेश उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिला.

ही इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवश्यावर आहे.

“ते एवढे सुडाने पेटले आहेत की शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपच्या डावाला बळी पडून ते आपल्या मुळावर घाव घालत आहेत. मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. जो बाळासाहेबांचाही होता. मागितलं तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्या ईर्षेने आणि जिद्दीने मी उभा राहिलो आहे. ही इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवश्यावर आहे. तुम्ही सोबत असल्यास मला कशाचीही पर्वा नाही. समोर भाजप असू दे की हे गद्दार नामर्द असू दे. मला त्यांची पर्वा नाही. ते काही काळ सत्ता उपभोगतील असंही ठाकरे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

त्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत

त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं आणि मतं मिळवावं. पण ही हिंमत यांच्यात नाही. कारण हे खरे मर्दच नाहीत. दुसऱ्यांचा पक्ष चोरणं, दुसऱ्याचं चिन्हं चोरण्याचा प्रयत्न करणं ते चोरलं जाऊच शकत नाहीत. दुसऱ्याच्या पक्षाचं नाव चोरणं ते चोरलं जाऊच शकत नाही. याला हिंमत लागते, हे चोरांचं काम आहे. आता जे काही चाललं आहे. त्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. या बोंबांना यांना बोंबलायचं तर बोंबलू द्या. काही दिवस हा खेळ चालेल. पण तोपर्यंत आज सुद्धा सांगतो. तुम्ही निष्ठेने सोबत आहात. तसं पाहिलं तर आमदार आणि खासदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो. त्याला लोकशाही नाही म्हणत. तुम्ही मनाने गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला कोंडू शकतो. त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. मी आजही कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांनाही सांगितलं ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा नाटकं करू नका. उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.