निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाचा झटका; शिंदे गटाकडे फक्त उद्या सकाळी दहा पर्यंतची वेळ
शिंदे गटाने सादर केलेले त्रिशुलउगवता सुर्य, गदा हे तीनही चिन्ह रद्द करण्यात आले आहे. त्यामुळं शिंदे गटाला तीनही नवीन चिन्ह सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील चिन्हाचा वाद मिटला आहे. निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाचा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत मोठा निर्णय दिला. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र, शिंदे गटाने चिन्हाबाबात दिलेले पर्याय शिंदे गटाने बाद केले आहेत. यामुळे चिन्हांचा पर्याय देण्यासाठी शिंदे गटाकडे फक्त उद्या सकाळी दहा पर्यंतची वेळ आहे.
ठाकरे गटाने त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटाने निवडणुक आयोगाकडे पाठवला होता. ठाकरेंनंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल याच चिन्हांवर दावा केला होता. तसेच शिंदे गटाने गदा, तलवार आणि तुतारी हे पर्याय देखील दिले होते.
धार्मिक मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाने त्रिशुळ आणि गदा ही चिन्ह बाद केली. तसेच उगवत्या सूर्य या चिन्हावर ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांनी दावा केला होता. यामुळे उगवता सूर्य हे चिन्ह देखील रद्द करण्यात आले.
त्यामुळं शिंदे गटाने सादर केलेले त्रिशुळ उगवता सुर्य, गदा हे तीनही चिन्ह रद्द करण्यात आले आहे. त्यामुळं शिंदे गटाला तीनही नवीन चिन्ह सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत शिंदे गटाला तीन नवीन चिन्ह सादर करावे लागणार आहेत.
