AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray Interview : केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे विरोधकांचं आयुष्य बरबाद करण्याचं षडयंत्र, संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलीय. त्यात राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या आरोपावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय.

Uddhav Thackeray Interview : केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे विरोधकांचं आयुष्य बरबाद करण्याचं षडयंत्र, संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांची मुलाखतImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 8:57 AM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनं शिवसेना (Shivsena) दुभंगली. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर अनेक राज्यातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचातय सदस्यही आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जातोय. दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे नेते गेले असले तरी कार्यकर्ते आपल्यासोबतच असल्याचा दावा करत संघटना अधिक मजबूत करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. अशास्थितीत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलीय. त्यात राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या आरोपावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय.

विरोधकांवर आरोप करायचे आणि त्यांना ‘कुंभमेळाल्या’ला न्यायचं

केंद्रीय तपास यंत्रणेबद्दल काही वेळेला न्यायालयाने सुद्धा आपली मत नोंदवलेली आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतंच सांगितलं आहे की, त्यांच्या एका महत्त्वाच्या नेत्याला अटक होण्याची शक्यता आहे. मनीष सिसोदियांना खोट्या आरोपाखाली अटक होण्याची शक्यता आहे. कालांतराने त्यातून ते सुटतील. पण तोपर्यंत त्यांचा आयुष्य तुम्ही बरबाद केलेलं असतं. असं कुणाचं आयुष्य बरबाद करून कुणाला सुख मिळेल असे मला वाटत नाही. अशी लोकं कधी सुखात राहू शकतात यावर माझा विश्वास नाही. देशात लोकशाही आहे. तुम्ही काय बोलायचं ते बोला, आम्ही काय बोलायचं ते बोलू. मात्र आत्ता ज्या पद्धतीने बदनामीकरण चाललेलं आहे, ते अत्यंत घाणेरड्या आणि विकृत भाषेत चाललेलं आहे. हे लाभणार नाही कुणाला. जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यावर आरोप करायचे, त्यानंतर त्यांना कुंभमेळ्याला न्यायचं. नितीन गडकरी मागे बोलले होते की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. ज्या लोकांवर आरोप होते ते लोक त्यांच्यामध्ये गेले आहेत. त्या लोकांचं पुढे काय होतं तेही सोडून द्या. पण नवीन नवीन लोकांना त्रास द्यायचा हे चांगल्या सशक्त राज्यकर्त्याचं लक्ष नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवलाय.

त्यांनी हुकूमशाही आणली म्हणत नाही, पण…

संजय राऊत यांनी सध्याच्या राजकारणात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं का? अशा आशयाचा प्रश्न विचारला. त्यावर ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकत्र येण्यासाठी सर्वात आधी गरजेचा आहे तो विचार. हे आणीबाणीच्या वेळेला लोकांनी अनुभवलेलं आहे. त्यावेळेस जनता पक्ष स्थापन झाला. जनता पक्षाला प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग एजंटही नव्हता. तरीसुद्धा लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली. त्यावेळेला सर्व स्तरातील लोक बाहेर पडून आवाज उठवत होते. जनता पक्ष सत्तेवर आला आणि आपसात भांडून स्वतःच सरकार स्वतः पाडलं. पण त्यामुळे एक इच्छाशक्ती पाहिजे. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. मी आता यांनी हुकूमशाही आणली म्हणत नाही. मात्र ज्या दिशेने ही पाऊल पडत आहेत ती बरी नाहीत, असं अनेकांचं मत आहे.

माझं ‘ते’ वचन अजूनही अर्धवट

देशातील सर्व राज्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. भाजपने अधिक शत्रू न वाढवता, एक ज्याला आपण आरोग्यदायी राजकारण म्हणतो ते करावं. आम्ही 25 30 वर्ष त्यांचे सोबती होतो. तेव्हा त्यांनी 2014ला युती तोडली. कारण काहीही नव्हतं. तेव्हाही आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही. तेव्हाही भाजपची आणि शिवसेनेची युती ही शेवटच्या क्षणाला तुटली होती. आम्ही काय मागत होतो? मी आत्तासुद्धा अडीच वर्षेच मुख्यमंत्रीपद शिवसेनेसाठी मागत होतो. त्याचं कारण असं की मी सरत्या काळामध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल आणि तसं बघितलं तर माझं ते वचन अजूनही अर्धवट आहे. कारण मी मुख्यमंत्री होईल असं मी कधीही बोललो नव्हतो. तेव्हा मला एक आव्हान स्वीकारावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टी ठरवल्यानंतर नाकारण्यात आल्या. त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावं लागलं, मी मुख्यमंत्री झालो. आता मी होऊन गेलो आहे. पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवत शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र डागलंय.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.