AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही ठरलं, फडणवीसांच्या विदर्भातूनच आमदार होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर, आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही ठरलं, फडणवीसांच्या विदर्भातूनच आमदार होणार?
| Updated on: Nov 29, 2019 | 3:56 PM
Share

यवतमाळ: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर, आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Vidhan parishad) हे अद्याप विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना (Uddhav Thackeray Vidhan parishad) सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सभासद व्हावं लागेल. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता दुसऱ्या आमदाराला राजीनामा द्यायला लावून पुन्हा विधानसभेची पोटनिवडणूक लढवणे हे तसं सोईचं नाही. त्याऐवजी उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जातील असं सांगण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भातून विधानपरिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून विधानपरिषदेवर जाण्याची चिन्हं आहे.

सध्या या मतदारसंघात शिवसेना आमदार तानाजी सावंत हे नेतृत्त्व करतात. मात्र तानाजी सावंत यांनी उस्मानाबादेतील परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाले आहेत. त्यामुळे आता यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या जागेवरुन विधानपरिषदेवर जाण्याची चिन्हं आहेत.

उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 2.30 च्या सुमारास मुख्यमंत्रिपदाचा भार स्वीकारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ग्रँड एण्ट्री केली. ‘मातोश्री’वरुन जवळपास दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray arrives at Mantralaya) मंत्रालयाकडे रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकात अभिवादन करुन मंत्रालयाकडे कूच केली. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांचं औक्षण 

मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांना ओवाळताना महिलांनी ईडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, असं म्हटलं. त्यावर नव्या मुख्यमंत्र्यांनी बळीराजाचं राज्यच येणार असं म्हणत ओवळणीच्या ताटात ओवाळणी दिली.

संबंधित बातम्या  

औक्षणावेळी महिला म्हणाल्या, ईडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, उद्धव म्हणाले…..   

तिकीट कापलेला भाजपचा माजी आमदार ‘मातोश्री’वर  

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.