AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिकीट कापलेला भाजपचा माजी आमदार ‘मातोश्री’वर

PNB बँकेबाबत भेट घेण्यासाठी नाही तर शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो, असं माजी आमदार सरदार तारासिंह यांनी सांगितलं.

तिकीट कापलेला भाजपचा माजी आमदार 'मातोश्री'वर
| Updated on: Nov 29, 2019 | 1:49 PM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले होते. तारासिंह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते, मात्र ही भेट होऊ शकली नाही. शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं सरदार तारासिंह यांनी (BJP Leader on Matoshree) सांगितलं.

पंजाब नॅशनल बँक कथित घोटाळ्या प्रकरणी तारसिंग यांचा मुलगा अटकेत आहे. भाजपने तिकीट कापल्यामुळे तारासिंग नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांच्याजागी उमेदवारी दिलेल्या मिहीर कोटेचा यांच्या प्रचारातही ते उतरले नव्हते. त्यातच सरदार तारसिंग यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मी आलो होतो, पण भेट झाली नाही. PNB बँकेबाबत भेट घेण्यासाठी नाही तर शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल. कोण म्हणतो सरकार चालणार नाही?’ असा सवालच सरदार तारासिंह यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बातचित करताना विचारला.

सरदार तारासिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.

बाळासाहेब थोरातांची 2 महिन्यापूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली!

दोनच दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष आगपाखड केली होती. अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले. मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा फटका भाजपला बसल्याचा घणाघातही खडसेंनी केला होता.

त्यानंतर खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात होते, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यामुळे त्यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सत्ता गमावल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जातं. यामध्ये तिकीट कापलं गेलेल्या किंवा पराभवाचा धक्का बसलेल्या नेत्यांचा समावेश (BJP Leader on Matoshree) आहे.

काय म्हणाले सरदार तारासिंह?

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज आहेत. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी त्यांच्या नावाची पाटी मंत्रालयातील केबिनबाहेर लागली असून ते पदभार स्वीकारण्यासाठी दुपारी मंत्रालयात दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दरवाजाबाहेर फुलांची आरास करण्यात आली आहे.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.