Uddhav Thackeray : राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख नात्यानं उद्धव ठाकरेंची पहिलीच पत्रकार परिषद! जाणून घ्या 3 मोठे मुद्दे

Shiv sena News Today : माझा चेहरा आज पहिल्यांदा तुम्हाला पडलेला दिसत असेल. मला दुःख झालंय. माझ्या पाठीत खंजीर खुपसलीये. कांजूरचा प्रस्ताव आहे, त्यात आमचा काहीही अहंकार नाहीय.

Uddhav Thackeray : राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख नात्यानं उद्धव ठाकरेंची पहिलीच पत्रकार परिषद! जाणून घ्या 3 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 2:39 PM

मुंबई : मुख्यमंत्रीपदावरुन (Maharashtra Chief Minister) पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवेसना पक्षप्रमुख या नात्यानं पहिल्यांच शिवसेना भवनातून (Uddhav Thackeray in Shiv sena Bhavan) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर पहिल्यांदाच सरकार पडल्यानंतर आणि नवं सरकार स्थापन झाल्याबाबतची प्रतिक्रिया दिली. शिवसेना भवनात मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी जमलेले होते. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाआधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात केली. तीन महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं.  नेमके यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलेले ते तीन मोठे मुद्दे कोणते होते, जाणून घेऊयात..

1. माझा राग मुंबईवर काढू नका :

मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा आता राजकारण चर्चेत येणार आहे. माझा राग मुंबईवर काढू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मेट्रो कारशेडवर महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. माझा चेहरा आज पहिल्यांदा तुम्हाला पडलेला दिसत असेल. मला दुःख झालंय. माझ्या पाठीत खंजीर खुपसलीये. कांजूरचा प्रस्ताव आहे, त्यात आमचा काहीही अहंकार नाहीय. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा आग्रह उगाच रेटू नका. पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका. आता तर वरतीही तुमचं सरकार आहे, त्यामुळे मुंबईची जमीन मुंबईच्या हिसासाठी वापरा. कांजूरला गेल्यानंतर ती मेट्रो थेट बदलापूरपर्यंत जाईल, असा विचार करुन तो निर्णय घेतला आहे.

2. तो शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही :

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. अमित शाहांनी माझा शब्द पाळला असता, तर हेच सरकार शानदारपणे आलं असतं. माझं ऐकलं असतं, तर अडीचवर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता तर पाचही वर्ष होणार नाहीये, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

3. मला कशाला मुख्यमंत्री बनायला लावलं? :

अमित शाह यांनी मातोश्रीवर माझ्यासोबत जो करार केला होता, त्यानुसार जर झालं असतं तर महाविकास आघाडी सरकारच जन्माला आलं नसतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, तर मुख्यमंत्र्यांची सही, मग माझी पक्षप्रमुख म्हणून सही, मग आमच्या कराराप्रमाणे हे पत्र फ्रेम करु मंत्रालयात लावायचं, म्हणजे सगळ्यांना कळलं असतं, ही नेमकं ठरलं काय असतं. हे असं सरकार करुन तुम्हाला काय मिळणार आहात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

वाचा राज्यातील राजकीय घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स :Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.