अर्जुन खोतकरांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली, काँग्रेसकडून ऑफर : सूत्र

अर्जुन खोतकरांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली, काँग्रेसकडून ऑफर : सूत्र

जालना : शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर मुंबईत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करुन, समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना काँग्रेसने ऑफर दिली आहे. आगामी लोकसभा निवडणूक आमच्याकडून लढावी, अशी ऑफर काँग्रेसने खोतकरांना दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

जालन्यातील विद्यमान खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. मात्र, शिवसेना आणि भाजपच्या युतीमुळे अपरिहार्यपणे हे दोघेही एकत्र येत निवडणुका लढवतात. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे. दानवेंविरोधात मीच लढणार, अशी गर्जनाही खोतकरांनी जालन्यात अनेकदा केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत पाडण्यासाठी खोतकरांनी सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तशी भूमिका त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र आता शिवसेना-भाजपची युती झाल्याने अर्जुन खोतकर आता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

युती झाली तरी बेहत्तर, दानवेंना विरोध कायम: अर्जुन खोतकर

पराभव दिसल्यावर माणूस चवताळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय : खोतकर

रावसाहेब दानवेंची गावरान भाषेत अब्दुल सत्तार आणि खोतकरांवर टीका

स्पेशल रिपोर्ट: 1 युती आणि 100 सवाल!

रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!

‘त्यांच्या’ खात्यात 5000 जमा होणार, दानवे की बोली और बंदूक की गोली

दानवेंना पाडण्यासाठी सेनेचे मंत्री काँग्रेसचा ‘हात’ धरणार?

रावसाहेब दानवेंकडून भाजपचा दुसरा उमेदवार घोषित!

जालना लोकसभा : 20 वर्षांपासून खासदार, पण दानवेंविरोधात नाराजी कायम

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI