Uddhav Thackeray : तो शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहे; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : मंत्रीपदासाठी शिवसेना कुणाच्या ढेंग्याखालून जात नाही. शिवसेना ही भाजपापेक्षा कित्येकपटीने प्रखर हिंदुत्ववादी आहे. म्हणून त्यांना शिवसेना हवीय. मात्र ठाकरे नकोत. कारण ठाकरे बोलतात, ठाकरे झोडून काढतात. पण ठाकरेंशिवाय शिवसेना ही कदापि होवू शकणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

Uddhav Thackeray : तो शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहे; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शिंदेंवर हल्लाबोल
तो शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहे; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शिंदेंवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
अक्षय कुडकेलवार

| Edited By: भीमराव गवळी

Jul 29, 2022 | 3:17 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर टीका केली आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचा फोटो हवा आहे. मात्र, त्यांचा मुलगा नकोय. मी बाळासाहेबांचा वारसा पुढे घेवून चाललोय म्हणून मी त्यांना नकोय. तुम्ही याला घराणेशाही म्हणता तर म्हणा. लोकसभा निवडणूकीत युती होती. आमच्या खांद्यावर पाय ठेवून तुम्ही दिल्ली गाठली. मात्र 2014 च्या विधानसभेत असे काय झाले की तुम्ही त्यावेळी एकला चलो रे चा नारा दिला. कारण त्यावेळी तुम्हाला शिवसेना संपवायची होती, असा आरोप करतानाच आता तुम्ही म्हणणार की आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. तो शिवसैनिक नाही तर दगाबाज मुख्यमंत्री आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला लक्ष्य केलं.

शिवसेना ही लोभापायी कुणाच्या पालख्या वाहत नाही. मंत्रीपदासाठी शिवसेना कुणाच्या ढेंग्याखालून जात नाही. शिवसेना ही भाजपापेक्षा कित्येकपटीने प्रखर हिंदुत्ववादी आहे. म्हणून त्यांना शिवसेना हवीय. मात्र ठाकरे नकोत. कारण ठाकरे बोलतात, ठाकरे झोडून काढतात. पण ठाकरेंशिवाय शिवसेना ही कदापि होवू शकणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

हिंमत असेल तर नवा पक्ष काढा

हा लढा पैसा विरुद्ध निष्ठा असा आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला दाखवून द्यायचे आहे की निष्ठा ही पैशाने विकत घेता येत नाही. हे सर्व चोरायला निघाले आहेत. सिंबॉल चोरत आहेत. ही मर्दांची टोळी नाही तर चोरांची टोळी आहे. आज हे यांच्या त्यांच्याकडे भेटायला जात आहेत. निष्ठेने राहिला असतात तर याच्या त्याच्याकडे जायची गरज नसती. लोक तुम्हाला भेटायला आले असते. मी प्रत्येक दिवशी त्यांना आव्हान देतोय की जर मर्दांची अवलाद असाल तर स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावून निवडणूक लढा. हिम्मत असेल तर नवा पक्ष काढा शिवसेना कशाला चोरता? असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

प्रतिज्ञापत्रे भरून देण्यास सुरुवात

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाला सर्वांकडून प्रतिज्ञापत्र भेट म्हणून मागवले होते. त्याला अनेक शिवसैनिकांनी प्रतिसाद देखील दिला होता. तर त्याला टक्कर देत ठाण्यात देखील शिवसेना जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र आज भरून देत आहेत. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम इथेच हे प्रतिज्ञा पत्र भरून दिले जात आहेत. ठाणे महापालिकेतील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी त्यासाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी हे प्रतिज्ञा पत्र महत्त्वाचे मानले जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें