Udhav Thackeray : ..तर मी पक्षप्रमुख म्हणूनही पायउतार होतो, शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचं सामान्य शिवसैनिकांना आवाहन

मी राजीनामा (Resignation) द्यायला तयार आहे. मी पक्षप्रमुख म्हणूनही पायउतार होतो, पण माझ्या आमदारांनी, माझ्या शिवसैनिकांनी माझ्या समोर येऊन माझ्याशी बोलावं, असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय.

Udhav Thackeray : ..तर मी पक्षप्रमुख म्हणूनही पायउतार होतो, शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचं सामान्य शिवसैनिकांना आवाहन
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 6:41 PM

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवेसनेत मोठा भूकंप झाला. मात्र, या भूकंपानंतर शिवसेना पुन्हा नेटानं उभी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट शिवसैनिकांनाच आवाहन केलंय. मी राजीनामा (Resignation) द्यायला तयार आहे. मी पक्षप्रमुख म्हणूनही पायउतार होतो, पण माझ्या आमदारांनी, माझ्या शिवसैनिकांनी माझ्या समोर येऊन माझ्याशी बोलावं, असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय. या फेसबुक लाईव्हद्वारे उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा डाव पलटवण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे.

‘वचन पूर्ण करणारचं म्हणून रणांगणात उतरलो होतो’

शिवसेनेचे आमदार गायब होऊन सूरला गेले, गुवाहाटीला गेले, त्यात मला पडायचं नाही. परवा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार हॉटेलात होते. मी म्हटलं ही कोणती लोकशाही आहे. आपल्या माणसांना अशाप्रकारे एकत्रं ठेवावं लागतं. अरे हा कुठे गेला तो कुठे गेला. त्यावर शंका घेतली जात होती. लघूशंकेला गेला तरी शंका घेतली जात होती. मला काहीच अनुभव नव्हता. मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारचं म्हणून रणांगणात उतरलो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तुम्ही माझ्याशी बोलायला हवं होतं, उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन

ठाकरे म्हणाले की, आज मी नेमकं काय बोलणार? मला दुख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दुखं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे असं सांगितलं, त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तुम्ही नकोत, असं त्यांनी बोलायला हवं होतं. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतो. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केलाय.

‘तुम्ही या आणि माझं राजीनामा पत्रं घ्या’

उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे की, माझ्यासमोर येऊन बोला. शिवसेनेशी गद्दारी करु नका. ही शिवसेना आपली आहे. यामुळे नुकसान कुणाचं होत आहे? एक गोष्ट आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. हीच ती गोष्ट आहे. त्याचा अर्थ अनेकांना माहीत नाही. एकदा एका जंगलात एक लाकूडतोड्या झाड तोडत होता, घाव घालत होता. त्यावर राहणारे सर्व पक्षी कासावीस झाले. आपला आसरा जाणार असं त्यांना वाटत होतं. घाव घालत असताना झाडालाही वेदना होत होत्या. त्यामुळे पक्षी झाडाशी बोलू लागले. दादा, तुला खूप दुखत असेल ना रे. तुझ्यावर कुऱ्हाडीचे घाव पडत आहेत ना. त्यावर झाड म्हणाले, मला दुख होतंय वेदना होतात. पण कुऱ्हाडीच्या घावाच्या नाही. तर ज्या कुऱ्हाडीने घाव घातला जातोय त्याचं लाकूड माझ्याच फांदीचं आहे. त्याच्या मला वेदना होत आहेत. हेच आज चाललं आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा गोतास काळ म्हणजे आपली राजकारणातील जन्मदात्री आहे. तिचचं लाकूड वापरून घाव घालू नका. या समोर बसा, मी देतो राजीनामा, तुमच्या हातात राजीनामा देतो, आज तयार करतो. तुम्ही या आणि माझं राजीनामा पत्रं घ्या. मी नाही जात, कारण मला कोविड झाला. जर राज्यपाल म्हणाले उद्धव ठाकरेंना येऊ द्या, तर मी यायला तयार आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.