सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान मिळताच राष्ट्रवादी अलर्ट मोडवर, तडकाफडकी…आता गेम फिरणार!
राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गुपचूप झाली, असा हास्यास्पद आक्षेप त्यांनी घेतला आहे. वरळी डोम येथे एकमुखाने सुनेत्रा पवार यांची निवड झाली. निवडणूक आयोगाने याबाबत योग्य ती कायदेशीर पडताळणी करून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची मान्यता दिली, असे उमेश पाटील यांनी सांगितले.

Sunetra Pawar : झारखंडमधील नेते तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाने नोटीस पाठवली आहे. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील निवड अवैध आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या नोटिशीनंतर राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या नोटिशीवर अजित पवार गाटाचे नेते उमेश पाटील यांनी सविस्तर सांगितलं आहे. सिंह यांना कोणी फूस लावलेली आहे, याचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीवर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष यांनी नोटीस दिली अशा बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र पक्षाच्या घटनेनुसार काही आक्षेप असतील तर पक्षांतर्गत विषय मांडावा लागतो. तो विषय कोर्टामार्फत दाखल करता येत नाही. तरीही त्यांनी काही नोटीस पाठवली आहे. ती नोटीस आम्हाला मिळालेली नाही, अशी माहिती उमेश पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गुपचूप झाली, असा हास्यास्पद आक्षेप त्यांनी घेतला आहे. वरळी डोम येथे एकमुखाने सुनेत्रा पवार यांची निवड झाली. निवडणूक आयोगाने याबाबत योग्य ती कायदेशीर पडताळणी करून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची मान्यता दिली. सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीला कोणताही आधार उरत नाही. तरीही सिंह यांनी घेतलेल्या प्रत्येक आक्षेपावर कायदेशीर उत्तर दिले जाईल. सच्चिदानंद सिंह यांनी पक्षात शिस्तभंग केली आहे. त्याची देखील दखल घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पक्षात काही अतृप्त आत्मे आहेत. त्यांना पक्ष चांगला चाललेलं खूपत नाही. पक्षाच्या शिस्तपालन समितीसमोर न जाता थेट नोटीस पाठवणे चुकीचे आहे. पवार कुटुंबाला आव्हान द्यायची ताकद महाराष्ट्रात कोणालाही नाही. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व एक मुखाने स्वीकारलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व असेल तरच भविष्यात निवडणुका जिंकू शकतो असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांना आहे. सच्चिदानंद सिंह यांचे नाव आमच्यासहित तुम्ही देखील पहिल्यांदाच ऐकले असेल. अजितदादा असताना सच्चिदानंद सिंह यांच्यासह अनेक निवडी झालेल्या आहेत. पक्ष सोडण्यापूर्वी सिंह यांचे विधान कदाचित प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेले असू शकते किंवा कोणीतरी त्यांचे कान भरलेले असू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
सुनिता पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्ष पद भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देखील आहे. आमच्या पक्षात येण्यासाठी अनेक नेते कार्यकर्ते इच्छुक आहेत. ते कार्यकर्ते संभ्रमित व्हावे म्हणून हा प्रकार केलेला असू शकतो. राष्ट्रवादीत अंतर्गत कोणताही वाद नाही. सच्चीदानंद सिंह यांना कोणी फूस लावली की त्यांनी स्वयंप्रेरणेने केलं की आणखी कोणाच्या बुद्धीने केलं याचा शोध आम्ही घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
अजितदादा असताना कर्जत येथे झालेल्या अधिवेशनात सच्चिदानंद सिंह यांची निवड झाली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या अधिवेशनातही तीच निवड कायम ठेवली होती. सुनेत्रा पवार यांच्या निवडीमध्ये सिंह उपस्थित होते किंवा नाही ती तपासावे लागेल. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सिंह त्या अधिवेशनात उपस्थित होते, असेही उमेश पाटील यांनी सांगितले.
