भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तीन महत्त्वाच्या जागा धोक्यात

परळीसह (Parli Result Pankaja Munde) कर्जत जामखेड आणि मुक्ताईनगर या जागाही धोक्यात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बालेकिल्ला असलेल्या या जागा धोक्यात आल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तीन महत्त्वाच्या जागा धोक्यात

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मोठी आघाडी घेतली. सुरुवातीच्या सात फेऱ्यांअखोर (Parli Result Pankaja Munde) धनंजय मुंडेंना 6870 मतांची आघाडी होती. विशेष म्हणजे त्यांचं मूळ गाव नाथ्रा आणि गोपीनाथ गड असलेल्या पांगरीतही राष्ट्रवादीने मुसंडी घेतली. परळीसह (Parli Result Pankaja Munde) कर्जत जामखेड आणि मुक्ताईनगर या जागाही धोक्यात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बालेकिल्ला असलेल्या या जागा धोक्यात आल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

परळीतील सुरुवातीच्या सात फेऱ्या

धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोषही सुरु केलाय. कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंच्या घराबाहेर फटाके वाजवले. परळी विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरीअखेर धनंजय मुंडे 6870 मतांनी आघाडीवर होते. सातव्या फेरीपर्यंत 63809 मते मोजण्यात आली होती, ज्यापैकी धनंजय मुंडे यांना 33254 आणि पंकजा मुंडे यांना 26384 मते मिळाली.

मुक्ताईनगर आणि कर्जत-जामखेडमध्येही चिंता वाढली

गेल्या 25 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये भाजपची जागा जाण्याची शक्यता आहे. कारण, शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी अजूनही कायम आहे. मंत्री राम शिंदे पिछाडीवर पडल्याने भाजप ही जागा गमावण्याची शक्यता आहे. विजयाचा जल्लोष करण्यासाठी रोहित पवार बुलेटवरुन मतदारसंघात दाखल झाले.

बंडखोरामुळे मुक्ताईनगरची जागाही भाजपच्या हातून जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवार रोहिणी खडसे यांना मागे टाकलं आहे. भाजपने इथे एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना संधी दिली होती. मात्र बंडखोरामुळे भाजपची जागा धोक्यात आली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI