AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…ही तर राजकीय आत्महत्या, वाईट वाटण्याचं कारण काय? राणे यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

...ही तर राजकीय आत्महत्या, वाईट वाटण्याचं कारण काय? राणे यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2022 | 8:23 AM
Share

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आता वाईट वाटून काहीच फायदा नाही. आत्महत्या करणाऱ्या माणसाला त्याचं काय वाईट वाटणार?, कारण तो स्वत:च आत्महत्या करत असतो. तशीच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च आपली राजकीय आत्महत्या केल्याची टीका नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने आमदारांशी वागले, पदाधिकाऱ्यांशी वागले त्यामुळे एक-एक जण त्यांच्या डोळ्यादेखत पक्षातून बाहेर पडला. 40 आमदार बाहेर पडले, मात्र एकालाही अडवण्याची उद्धव ठाकरे यांची हिंमत झाली नाही असं राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलं?

नायारण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. आत्महत्या करणाऱ्या माणसाला आत्महत्या केल्याचं काय वाईट वाटणार. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च त्यांची राजकीय आत्महत्या केली. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागले, त्यामुळे 40 आमदारांनी उठाव केला, मात्र त्यातील एकालाही आडवण्याची उद्धव ठाकरे यांची हिंमत झाली नाही. आता वाईट वाटून काय फायदा? हा नियतीचा खेळ असतो, कधीकधी काही गोष्टी वाटल्या तरी सांगायच्या नसतात असा सल्लाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मुंबईची जबाबदारी राणे यांच्याकडे

येत्या काळात मुंबईत महापालिका निवडणुकांसह इतरही काही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना रोखण्याची जबाबदारी भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सोपवल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या संघटनात्मक कार्यक्रमांचं आयोजनही काही दिवसांपूर्वी मुंबईत करण्यात आलं होतं.

Follow Us
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद