VIDEO : रावसाहेब दानवेंनी भरसभेत स्वत:चा फाटलेला शर्ट दाखवला

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे त्यांच्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यातील (Pune) कार्यक्रमातही त्यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली.

VIDEO : रावसाहेब दानवेंनी भरसभेत स्वत:चा फाटलेला शर्ट दाखवला
Raosaheb Danve
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 3:21 PM

पुणे : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे त्यांच्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यातील (Pune) कार्यक्रमातही त्यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) होते. यावेळी भाषण करताना रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या पाटलेल्या शर्टचा किस्सा सांगितला.

मी सगळी पदं उपभोगली. मला मतदारसंघातील लोकांनी भरभरुन पदं दिली, मी केंद्रात तीनवेळा मंत्री जरी झालो असलो तरी साधेपणा सोडला नाही. काल मी हैद्राबादला आमच्या एका मित्राकडे गेलो होतो. मोठा माणूस आहे तो, तेव्हा तो म्हणाला, दादा तुम्ही खादीचा शर्ट घ्या. का तर म्हणाला तुमचा शर्ट फाटलाय. नवीन शर्ट घ्या. मी म्हटलं शर्ट फाटलाय म्हणून काय फरक पडला? आता इथे तुम्ही सगळे पुण्याची माणसं आहेत, यात कुणी फाटक्या शर्टचा माणूस येऊन बसलाय का मला सांगा बरं. घरातील बाईने तुमच्या तुम्हाला सांगितलं असेल, तुमचं शर्ट फाटलंय, बदलून घ्या. असा कुणी माणूस आहे का फाटलेला शर्टाचा.. बघा माझा शर्ट इथे फाटलाय, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी भर मंचावर त्यांचा फाटलेला शर्ट दाखवला.

लोक म्हणाले शेवटचं मत देऊ

यावेळी रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीवेळचाही किस्सा सांगितला. निवडणुकीत दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्याचे प्रमाणपत्र घेण्यावेळी शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर माझ्यासोबत होते. त्यावेळी लोणीकर म्हणाले एकही सभा न घेता इतक्या मोठ्या फरकाने दानवे निवडून कसे आले. त्यावर खोतकर म्हणाले लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल, शेवटचं मत देऊन टाकावं म्हणून निवडून आले असतील, असा किस्सा दानवेंनी सांगितला.

वीज संकटाला राज्य सरकार जबाबदार

राज्यात कोळसा टंचाईमुळे वीज संकट निर्माण झालंय, याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठा कुठेही कमी करण्यात आलेला नाही. समजा wcl कोळसा देत नसेल तर मी स्वत: कंपनी व्यवस्थापनाशी बोलेन. केंद्रीय रेल्वे आणि कोळसा खणीकर्म मंत्र्यांशी बोलेन. हे अमर, अकबर, अँथनीचं सरकार सध्या पुरतं गोंधळात पडलेलं आहे. लवकरच आपआपसातील मतभेदाने हे पडेल, याची आम्हाला खात्री आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

भाजपला फायदेशीर होईल अशी 3 चा प्रभाग रचना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे का करताहेत हे तुम्ही शिवसेनेलाच विचारा, आम्ही सध्या प्रबळ विरोधकांच्याच भूमिकेत आहोत, असं दानवेंनी सांगितलं.

मराठा, ओबीसी आरक्षण गोंधळाला राज्य सरकारच जबाबदार, इम्पिरीकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी ही राज्याचीच, केंद्राची नाही. तसंच रेल्वेचं कुठेही खासगीकरण होत नाही, तर आम्ही तोटा करण्यासाठी रेल्वेच्या मालमत्ता लीजवर देत आहोत, असं दानवेंनी नमूद केलं.

VIDEO :रावसाहेब दानवेंनी फाटलेला शर्ट दाखवला

संबंधित बातम्या  

VIDEO: तुम्ही जर म्हटलं आम्हाला रेल्वे चालवायला द्या, तर त्याचीही केंद्राची तयारी आहे; रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.