AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ई-पासचे काय होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

ई-पासचे काय होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
| Updated on: Aug 30, 2020 | 6:11 PM
Share

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरात ‘अनलॉक 4’च्या गाईडलाईन्स जारी करण्यात (CM Called Meeting For E-Pass) आल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्सही जारी होणार आहेत. याअंतर्गत ई-पासबाबत उद्या (31 ऑगस्ट) राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होणार आहे. ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे (CM Called Meeting For E-Pass).

ई-पास संदर्भात राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. कारण, अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात होती. त्यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सचिव आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील ई-पास रद्द होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘अनलॉक 4’च्या गाईडलाईन्स जारी

केंद्राने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 7 सप्टेंबरपासून अटी-शर्तींसह मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तर ओपन एअर थिएटर हे 21 सप्टेंबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय येत्या 21 सप्टेंबरपासून सामजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांना 100 लोकांसह परवानगी दिली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन लावू नये अशी सूचनाही राज्यांना देण्यात आली आहे (CM Called Meeting For E-Pass).

‘अनलॉक-4’मध्ये काय सुरु, काय बंद?

  • कंटेनमेंट झोनबाहेर लॉकडाऊन नाही.
  • कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
  • ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावता येणार
  • 21 सप्टेंबरपासून फक्त 100 लोकांच्या सहभागात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना मंजुरी
  • सप्टेंबरपासून मेट्रो रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरु होणार
  • मोकळ्या जागांवरील (ओपन एअर) थिएटर 21 सप्टेंबरपासून सुरु करता येणार
  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स बंदच राहणार
  • आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंदच राहणार
  • 21 सप्टेंबरनंतर लग्न समारंभास 50 ऐवजी 100 वऱ्हाड्यांची उपस्थितीत राहता येणार
  • 21 सप्टेंबरनंतर अंत्यसंस्कारासाठी 20 ऐवजी 100 लोकांना हजर राहता येणार

‘या’ गोष्टी बंदच राहणार

  • सिनेमा हॉल स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क
  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक

केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या विमानांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.

CM Called Meeting For E-Pass

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या सवलतींची मुदत संपणार, 1 सप्टेंबरपासून सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे मोठे बदल

UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...