AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

'वंचित बहुजन आघाडी'चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला (Vanchit Bahujan Aghadi Ex MLAs enters NCP)

दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
| Updated on: Jun 03, 2020 | 2:37 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका असतानाच राजकीय वादळही पाहायला मिळाले. ‘वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. (Vanchit Bahujan Aghadi Ex MLAs enters NCP)

बळीराम शिरस्कर हे ‘वंचित’च्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला होता.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.

बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल डोंगरे हेसुद्धा कोणे एके काळी ईशान्य मुंबईत वंचितचे नेतृत्व करत होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी डोंगरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता. आता वंचितचे आणखी दोन आमदार सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत.

हेही वाचा : “43 वर्ष राजकुमारीसारखी राहिले, पण…” माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास

(Vanchit Bahujan Aghadi Ex MLAs enters NCP)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.