AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasant More : राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत..! पक्ष निरीक्षकपदी निवडीनंतर काय म्हणाले मोरे?

मनसेच्या भूमिकेमुळे वसंत मोरेंची अडचण झाली होती. कात्रजमधून वसंत मोरे गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीनं मराठा आहेत. मात्र त्यांच्या प्रभागातला मुस्लिम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठिशी राहिला आहे. पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवून साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Vasant More : राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत..! पक्ष निरीक्षकपदी निवडीनंतर काय म्हणाले मोरे?
मनसे नेते वसंत मोरे
| Updated on: Aug 22, 2022 | 8:28 PM
Share

पुणे : राज्यात आगामी काळात होणाऱ्या (Election) निवडणुकांच्या अनुशगांने आता मनसेही पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरणार असल्याचे चित्र आहे. (MNS Party) पक्ष संघटनेसाठी (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली अन् पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असेच चित्र आहे. शिवाय लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष निरीक्षकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामतीच्या पक्ष निरीक्षकपदी पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांची निवड करण्यात आली. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरुन बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर दिल्लीलापण आपण धडक देऊ..मराठ्याच्या जात आहे मागे पुढे पाहणार नसल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे. केवळ बारामतीच नाहीतर त्याचबरोबर पुणे शहरचीही जाबाबदारी हे अधिरोखित कऱण्यासारखे आहे.

मोरेंचा रोष कुणावर?

मनसेच्या भूमिकेमुळे वसंत मोरेंची अडचण झाली होती. कात्रजमधून वसंत मोरे गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीनं मराठा आहेत. मात्र त्यांच्या प्रभागातला मुस्लिम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठिशी राहिला आहे. पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवून साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली होती. असे असताना मोरे यांनी आपल्याकडे केवळ बारामतीचीच जबाबदारी नाहीतर भोर , वेल्हा , पुरंदर , हवेली , आणि पुणे शहर हे ही आहे बरं का ! असंही मोरे म्हणाले असून मी परत येतोय असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचा रोष नेमका कुणावर अशी चर्चा रंगली आहे.

निवडीनंतर पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह

मनसेच्यावतीने पुणे जिल्ह्यातील तिन्हही लोकसभा मतदारसंघासाठी पक्ष निरीक्षकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये वसंत मोरे यांचीही वर्णी लागली आहे. मध्यंतरी पक्षातील धोरणावर नाराज असलेले मोरे चांगलेच चर्चेत आले होते. यानंतरही पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण आपले कसब पणाला लावू अशा आशयाची त्यांची फेसबुक पोस्ट आहे. साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ…कारण मराठ्याची जात कधी माघ पुढं बघत नाय.. असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी येतोय..!

मनसे केवळ लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगानचे नाहीतर स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये अस्तित्व पणाला लावणार असे चित्र आहे. कारण मावळ मतदारसंघासाठी किशोर शिंदे, हेमंत संभूस आणि गणेश सातपुते हे असणार आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघासाठी अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांवर केवळ लोकसभाच नाही तर संबंधित भागातीलही जाबाबदारी राहणार आहे. शिवाय केवळ बारामतीच नाहीतर भोर , वेल्हा , पुरंदर , हवेली , आणि पुणे शहरचीही जबाबदारी असल्याचे म्हणत मी परत येत असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.