Video : राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटलांची घणाघाती टीका

पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत केलेला भन्नाट डान्स लक्ष वेधून घेत आहेत. अशावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrisha Vikhe-Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

Video : राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटलांची घणाघाती टीका
राधाकृष्ण विखे-पाटील यांची संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंवर टीका
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 7:32 PM

अहमदनगर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा पार पडतोय. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत केलेला भन्नाट डान्स लक्ष वेधून घेत आहेत. अशावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrisha Vikhe-Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’, असा हल्लाबोल विखे-पाटील यांनी केलाय.

एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारला केलाय.

पूर्वशी आणि मल्हारचा उद्या विवाह

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.

संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी डान्सनंतर वधूमाय वर्षा राऊत यांनाही बोलावलं. त्यानंतर लाजऱ्या-बुजऱ्या वर्षा राऊतांनी पतीसह डान्स केला. अनेकांनी दोघांच्या डान्सची तारीफ केली आहे.

कोण आहेत संजय राऊतांचे व्याही?

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

तर नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.

इतर बातम्या :

हर्षवर्धन पाटलांच्या धरणं आंदोलनाला यश, ऊर्जा मंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

संधी मिळताच जनता आघाडीला फेकून देईल, चंद्रकांत पाटलांनी केला ठाकरे सरकारचा पंचनामा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.