AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत रंगली चुरस, भाजप, शिंदे गटासह अजित पवारांकडूनही दावा

विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या पदासाठी महायुतीत चुरस रंगणार आहे.

विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत रंगली चुरस, भाजप, शिंदे गटासह अजित पवारांकडूनही दावा
अजित पवार
| Updated on: Jul 11, 2024 | 10:34 AM
Share

Vidhan Parishad Election 2024 : सध्या सर्वत्र विधानपरिषदेच्या निवडणुकांची धामधुम सुरु आहे. त्यातच आता गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या सभापतीची निवड होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातच याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या पदासाठी महायुतीत चुरस रंगणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत सहभागी होताना विधानपरिषदेत सभापती पद देण्याचे आश्वासन दिले होते, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणं आहे. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे असे चार सदस्य आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने विधानपरिषदेच्या सभापती पदावर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही सभापती पदावर दावा करण्यात आला आहे. भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून विधानपरिषद निवडणुकीची तारीख निश्चित करुन सर्वानुमते एकच उमेदवार निवडला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस रंगणार

विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी ऑगस्ट 2022 मध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत संपली होते. त्यानंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून सभापतीपद रिक्त आहे. त्यातच आता आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने ते भरले जाईल, असे सांगितले जाते. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस रंगणार याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते. त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते.

निवडणुकीत ट्वीस्ट येण्याची शक्यता

येत्या शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतरचे पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवण्याबद्दल पत्र जाणे गरजेचे आहे. विधानपरिषद सभागृहात 78 पैकी 27 जागा रिक्त असून महायुतीकडे बहुमत आहे. त्यातच आता अजित पवार गटाने सभापती पदावर दावा केल्याने निवडणुकीत ट्वीस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.