AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Presindet Election : आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान, महाराष्ट्रातील आमदारांच्या मतदानाची वेळ काय? कोण मतदान करणार, कोण नाही? वाचा एका क्लिकवर

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार हे यशवंत सिन्हा यांनाच मतदान करतील असं सांगण्यात आले, सध्याचं चित्र पाहिल्यास द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड दिसत आहे. त्यांना पाठिंबा वाढला आहे. 

Presindet Election : आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान, महाराष्ट्रातील आमदारांच्या मतदानाची वेळ काय? कोण मतदान करणार, कोण नाही? वाचा एका क्लिकवर
द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?, देशाचा नवा राष्ट्रपती कोण?; Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2022 | 6:51 AM
Share

मुंबई : लवकरच देशाला नवे राष्ट्रपती मिळणार (President Election 2022) आहेत. त्यासाठीची मतदान प्रक्रिया (Voting Time) आज पार पडत आहे. देशभरातील आमदार आणि खासदार या निवडणुकीत मतदान करत असतात. महाराष्ट्रातील आमदार (Maharashtra Assembly Voting Time) आणि खासदारही यासाठी मतदान करणार आहेत. विधानसभेतले सर्व आमदार यासाठी मतदान करू शकतात. तर सर्व खासदारांनाही यात मतदान करायचं आहे. शिवसेनेने आधीच या  निवडणुकीत आपला पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना जाहीर केला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार हे यशवंत सिन्हा यांनाच मतदान करतील असं सांगण्यात आले, सध्याचं चित्र पाहिल्यास द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड दिसत आहे. त्यांना पाठिंबा वाढला आहे.  महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडणार आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊया…

अशी पार पडेल मतदान प्रक्रिया

  1. महाराष्ट्राच्या विधानसभेत सकाळी साडेनऊ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व आमदार मतदान करू शकतील, पाच वाजल्यानंतर कुणालाही मतदान करता येणार नाही, तर याच वेळेत खासदार ही मतदान करतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
  2. या मतदान प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे यात पक्षाचा व्हीप नसणार आहे. त्यामुळे ही मतदान प्रक्रिया आणखी सोपी होऊन जाते. तसेच वादही टळतात. तर हे मतदान बॅलेट पेपर वरती पार पडेल, म्हणजेच मतपत्रिका दिल्या जातील.
  3. जर कदाचित एखादा आमदार किंवा एखादा खासदार विधान भवन परिसरात उपलब्ध नसेल, काही कामानिमित्त किंवा इतर कोणत्या कारणाने बाहेर कुठे असेल तर तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे ही मतदानाचा हक्क बजावू शकतात, मात्र तशी पूर्वसूचना देणे गरजेचे असते.
  4. आज जरी ही मतदान प्रक्रिया पार पडत असली तरी निकालासाठी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. 21 जुलैला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहे, त्यामुळे तीन दिवसात नवे राष्ट्रपती कोण? याही प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल.
  5. राष्ट्रपती निवडणुकीसाठी पहिल्यांदा आदिवारी महिला द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा ही निवडणूक लढवत आहेत. मात्र पक्षाचे मतभेद विसरून या निवडणुकीत मतदान करण्याची परंपरा अनेक राजकीय पक्षांनी जपली आहे. त्यामुळेच मुर्मू यांचा पाठिंबा चांगलाच वाढला आहे.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.