AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमच्या उत्तराखंडमध्येही असे गड आहेत, एकदा तुम्ही या तिकडे’, राज्यपालांचं सिंहगडवासियांना निमंत्रण

शाल श्रीफळ देत सिंहगडवासियांनी राज्यपालांचा सत्कार केला. सिंहगडवासियांच्या पाहुणचाराने राज्यपाल भारावले. तिथे उपस्थित नागरिकांना त्यांनी उत्तराखंडला येण्याचं आमंत्रण दिलं. आमच्या उत्तराखंडमध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे.... असं म्हणत राज्यपाल पुढे मार्गस्थ झाले.

'आमच्या उत्तराखंडमध्येही असे गड आहेत, एकदा तुम्ही या तिकडे', राज्यपालांचं सिंहगडवासियांना निमंत्रण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सिंहगडाला भेट दिली.
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 1:28 PM
Share

पुणे :  पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) यांनी आज सिंहगडाला (Sinhgad) भेट दिली. यावेळी सिंहगडवासियांच्या पाहुणचाराने भारावलेल्या राज्यपालांनी स्थानिकांना उत्तराखंडला येण्याचं निमंत्रण दिलं. आमच्या उत्तराखंडमध्येही असे गड आहेत, एकदा तुम्ही या तिकडे, असं निमंत्रण राज्यपाल कोश्यारी यांनी सिंहगडवासियांना दिलं.

राज्यपाल तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. आज नियोजित दौऱ्यात असलेल्या सिंहगडाला त्यांनी भेट दिली. गडाची पाहणी केली. तसंच शिवराय आणि तानाजी मालुसरेंना त्यांनी अभिवादन केलं.

सिंहगडवासियांच्या पाहुणचाराने राज्यपाल भारावले, उत्तराखंडला येण्याचं आमंत्रण

सिंहगडावर भगत सिंह कोश्यारी यांनी तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. समाधी परिसरात वृक्षारोपण केलं. यावेळी सिंहगडावर राहणार्‍या नागरिकांनी राज्यपाल येणार्‍या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. तसंच त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर wel come लिहिले होतं. तर काही ठिकाणी महिलांनी राज्यपालांचं औक्षण देखील केलं.

शिवाय शाल श्रीफळ देत सिंहगडवासियांनी राज्यपालांचा सत्कार केला. सिंहगडवासियांच्या पाहुणचाराने राज्यपाल भारावले. तिथे उपस्थित नागरिकांना त्यांनी उत्तराखंडला येण्याचं आमंत्रण दिलं. आमच्या उत्तराखंडमध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे…. असं म्हणत राज्यपाल पुढे मार्गस्थ झाले.

मुलांनी तानाजी मालुसरे बनलं पाहिजे

“माझ्या राजकीय जीवनात शिवाजी महाराज एका नवीन अवतारात आले. युक्ती, बुद्धी, शक्तीचं गुणगान इतिहासकारांनी केलं आहे, युक्ती, बुद्धी आणि शक्तीने शिवाजी महाराजांनी राज्य केलं. शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे हिरो आहेत. तानाजी मालुसरे यांचा इतिहास मुलांना समजला पाहिजे. तो शिक्षणात आला पाहिजे. मुले तानाजी मालुसरे बनले पाहिजेत”, असं राज्यपाल म्हणाले

राज्यपालांचा पुणे दौरा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते राजभवनात परिसरात ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्यपालांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे.

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली. यावेळी राज्यपाल महोदयांनी पुरंदरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसंच अखंड आयुष्य शिवरायांप्रती वाहून घेतल्याने त्यांना धन्यवाद दिले.

(We have such forts in Uttarakhand too, once you come there’, Governor BhagatSinh Koshyari invites Sinhagad Citizen)

हे ही वाचा :

हर्षवर्धन पाटलांची लेक 4 मागण्या घेऊन राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.