रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीचा तिढा कधी सुटणार? निलेश राणे म्हणाले…

फॉर्म भरायची वेळ जवळ आली आहे. पण महायुतीकडून अद्यापी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेली नाही. महायुतीकडून नारायण राणे आणि किरण सामंत यांची नाव चर्चेत आहेत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर दावा सांगितला जातोय. हेच उमेदवारी जाहीर न होण्यामागे एक कारण आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीचा तिढा कधी सुटणार? निलेश राणे म्हणाले...
Nilesh Rane Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 2:58 PM

“फॉर्म भरायची वेळ जवळ आली आहे. आज किंवा उद्या उमेदवारी जाहीर होईल. रत्नागिरी-सिंधुदुर्गात अडचण नाहीय. दोन-तीन ठिकाणी अडचणीचे काही विषय असतील. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कुठलीही अडचण नाहीय” असं निलेश राणे म्हणाले. “महायुती आहे, मी पण लढावं असं वाटू शकतं. दोन-तीन जागा वाढवून मिळाव्यात असं वाटतं. त्यामुळे वेळ लागला असेल, मी त्या प्रक्रियेत नाही. आमच सगळ ठरलय. सगळे घटक पक्ष एक होऊन महायुतीच्या प्रचाराला लागले आहेत” असं निलेश राणे म्हणाले.

शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा सांगितला जातोय, त्यावर निलेश राणे म्हणाले की, “प्रत्येकाला असं वाटतं. आपण ही सीट लढवावी. सध्या वातावरण पोषक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. 100 टक्के महायुती जिंकणार, त्या बद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही”

‘कालच्या सभेत फक्त 1200-1300 लोक’

“आम्ही विनायक राऊत यांना प्रतिस्पर्धी मानत नाही. फॉर्म भरताना शक्ती प्रदर्शन करायची एक पद्धत असते. कालच्या सभेत 1200-1300 लोक होते. राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव गट मिळून 1200-1300 लोकच होते. रत्नागिरी सारख्या ठिकाणी इतके कमी लोक. विनायक राऊत यांच्यापासून कुठलाही धोका नाही. आता जनतेपर्यंत पोहोचायच. त्यांची काम करुन द्यायची. मागच्या 10 वर्षाचा बॅकलॉग भरुन काढायचा. हेच व्हिजन ठेऊन काम करणार आहोत. महायुती म्हणून आम्ही एक आहोत, उमेदवारी कोणालाही मिळो, आम्ही एक होऊन लढू” असं निलेश राणे म्हणाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.