Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे सरकारचा फैसला कधी? सोमवारची सुनावणी लांबणीवर जाणार?

कुठेतरी गुवाहाटी सारख्या ठिकाणी बसून आम्हीच शिवसेना म्हणून सांगणं किती योग्य आहे? असा सवाल ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वकिलांकडून कोर्टात करण्यात आला होता त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितलेला होता.

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे सरकारचा फैसला कधी? सोमवारची सुनावणी लांबणीवर जाणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 5:42 PM

नवी दिल्ली : राज्यात शिंदे सरकार (Cm Ekanath Shinde) स्थापन होऊन एक महिना उलटून गेलाय. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार आतूनही रखडलेला आहे. त्यावरून विरोधकांकडून रोज टीका होत असताना कोर्टातली लढाई (Supreme Court) सुरूच आहे. कोर्टात गेल्या वेळी यावरती एक हायव्होल्टेज सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला आहे. त्यात एखाद्या मोठ्या गटाला आपला नेता बदलावा वाटल्यास त्यात गैर काय? असा सवाल एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. तर कुठेतरी गुवाहाटी सारख्या ठिकाणी बसून आम्हीच शिवसेना म्हणून सांगणं किती योग्य आहे? असा सवाल ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वकिलांकडून कोर्टात करण्यात आला होता त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितलेला होता.

सरकारचा फैसला मंगळवारी होण्याची शक्यता

त्यानंतर कोर्टाने 27 जुलै पर्यंत कागदपत्र दाखल करण्यासाठी वेळ दिला होता. तसेच पुढील सुनावणी ही एक ऑगस्टला होईल असे जाहीर केले होते. या सुनावणीसाठी एक मोठं खंडपीठ असावं असे मत यावेळी कोर्टाने व्यक्त केले होते. आज 29 ऑगस्ट आहे, मात्र एक ऑगस्ट रोजी होणारी कोर्टातली सुनावणी पुढे जाणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. सोमवार ऐवजी मंगळवारी सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

घटनात्मक खंडपीठासमोर सुनावणी होणार?

या प्रकरआवर घटनात्मक खंडपीठांसमोर सुनावणी होणार आहे काय? याही प्रश्नाचं उत्तर अजून स्पष्ट नाही. त्यामुळे दोन ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डायरी क्रमांक 19161/2022 केसची सुनावणी सरन्यायाधीश वी रमन्ना, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी. न्यायमूर्ती सीमा कोहली यांच्यासमोर दोन तारखेला होण्याची शक्यता सर्वसाधारण वर्तवण्यात येत आहे.

खंडपीठासाठीही वेळ जाणार

वेळ पडल्यास या प्रकरणात मोठं खंडपीठ नेमलं जाऊ शकतं असंही गेल्या सुनावणीत सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घटनात्मक खंडपीठाचा विचार केल्यास 3, 5, 7, 11 न्यायाधीशांचं हे खंडपीठ असू शकतं, त्यामुळे येत्या मंगळवारी कदाचित ही सुनावणी होऊ शकते अशी माहिती विश्वासनीय सूत्राने दिली आहे. तसेच सोमवारी राज्य सरकारचा फैसला होणारा नसल्याचेही म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टातील या निर्णयावर राज्याातील राजकारणाची पुढची दिशा अवलंबून असणार आहे. तसेच शिवसेनेचं भवितव्यही याच सुनावणीवर अवलंबून असणार आहे. हा फैसला आमच्याच बाजूने येईल, विजय आमचाच होईल, असा दावा सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट असा दोन्हींकडून करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.