AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत देशाच्या पहिल्या ट्रान्सजेंडर आमदार शबनम मौसी? निवडणुकीपूर्वी या कारणामुळे अडचणीत

देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर आमदार शबनम मौसी यांच्याविरोधात पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्यांचा पिस्तुल परवानाही रद्द करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शबनम यांनी पिस्तुल पोलिसांकडे जमा केली नव्हती.

कोण आहेत देशाच्या पहिल्या ट्रान्सजेंडर आमदार शबनम मौसी? निवडणुकीपूर्वी या कारणामुळे अडचणीत
शबनम मौसीImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 23, 2023 | 7:41 PM
Share

मध्य प्रदेश : 23 नोव्हेंबर 2023 | देशात जेव्हा निवडणुकीचा हंगाम येतो, तेव्हा बरेच इतिहास रचले जातात. 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये पोटनिवडणुकीत असाच इतिहास रचला गेला होता. देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर आमदाराला निवडून दिलं होतं. त्यांचं नाव होतं शबनम बानो उर्फ शबनम मौसी. आता 23 वर्षांनंतर त्याच शबनम मौसी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र यावेळी त्या एका चांगल्या कारणासाठी नव्हे तर त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरमुळे चर्चेत आहेत. मध्यप्रदेशच्या शहडोलमधील सोहागपूर इथल्या माजी आणि पहिल्या किन्नर विधायक शबनम मौसी नेहमीच त्यांच्या कारनाम्यांमुळे चर्चेचा विषय ठरतात. यावेळीही त्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. एमपीच्या अनुपपूर जिल्ह्यात पोलिसांकडे पिस्तूल जमा न केल्याच्या आरोपामुळे शबनम यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत शबनम मौसी?

देशातील पहिल्या किन्नर आमदार शबनम मौसी यांनी 2000 मध्ये शहडोल जिल्ह्यातील सोहागपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली होती. तत्कालीन काँग्रेस आमदार कृष्णपाल सिंह यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली होती. त्यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा 17,800 हून जास्त मतांनी पराभव केला. मात्र 2003 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ 1400 मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. शबनम यांनी एका ऑटो ड्रायव्हरला मारहाण केल्यामुळेही चर्चेत आल्या होत्या.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम यांना पिस्तूल जमा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु तरीही त्यांनी ती जमा केली नाही. आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शबनम यांच्याकडे दोन बंदुका होत्या. त्यापैकी एक त्यांनी जमा केली होती आणि दुसरी जमा केली नाही. यामुळे प्रशासनाने त्यांच्या पिस्तुलाचा परवानाच रद्द केला आहे.

निवडणुकीत किन्नर

1994 मध्ये भारतात किन्नरांना मतदानाचा अधिका मिळाला. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या शबनम मौसी या देशातील पहिल्या किन्नर आमदार होत्या. तर पहिल्या किन्नर महापौरसुद्धा मध्यप्रदेशच्या कमला जान होत्या. 2018 मध्ये मध्यप्रदेशातील अंबा मतदारसंघातून पाच किन्नरांनी निवडणूक लढवून भाजप, काँग्रेस आणि बसपा या राष्ट्रीय पक्षांना थेट आव्हान दिलं होतं. 2018 मध्ये नेहा किन्नरने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. 23.85 टक्के मतं मिळवून त्या दुसऱ्या क्रमांकावर आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून चंदा किन्नर यांनाही तिकिट देण्यात आलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.