मलकापुरात कोण जिंकणार? माजी मुख्यमंत्री की माजी मुख्यमंत्र्यांचा जावई?

मलकापूर (सातारा) : कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं आणि आज निकाल लागणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनीही आपली ताकद …

मलकापुरात कोण जिंकणार? माजी मुख्यमंत्री की माजी मुख्यमंत्र्यांचा जावई?

मलकापूर (सातारा) : कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं आणि आज निकाल लागणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनीही आपली ताकद पणाला लावून, मुख्यमंत्र्यांपासून चंद्रकांत पाटलांपर्यंत सगळ्यांना या निवडणुकीत उतरवलं होतं. त्यामुळे त्यांची मलकापुरात आणि पर्यायाने कराडमध्ये ताकद किती, हेही आज स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीआधीची कराडमधील मिनी-विधानसभा निवडणूक म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

मतपेटी बंद, आज निकाल

मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान काल पार पडले. नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक पदांसाठी कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 82 टक्के मतदान झाले. तर आज म्हणजे 28 जानेवारीला मतमोजणी होणार असून सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात येतील.

विलासरावांचा जावई थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना टक्कर देणार

काँग्रेस विरुद्ध भाजप : दोन मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

काँग्रेस आणि भाजपने पक्ष चिन्हावर ही निवडणूक लढवली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मलकापूर शहरात गेल्या महिनाभरात अनेक राजकीय उलाढाली झाल्या. भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि भाजपचे नेते, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. त्यामुळे मलकापूरची लढाई पृथ्वीराज चव्हाण विरूध्द चंद्रकांत पाटील अशी रंगलेली दिसली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मलकापूर नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असलेल्या या निवडणुकीत जनतेने कुणाला निवडले आहे, हे तर आज मतमोजणी झाल्यावरच कळू शकेल.

मलकापूर ‘नगरपालिकेची’ पहिलीच निवडणूक

मलकापूर नगरपरिषदेची नगरपालिका झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव पडले असून, ओबीसी महिला नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे. मलकापुरात एकूण 9 प्रभाग पाडले असून 19 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

मलकापूर नगरपालिका निवडणूक : माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंद

कराड नगरपरिषद निवडणूक जाहीर, माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

कराडमधील मलकापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा धुरळा उडाला!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *