AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhav Thackeray : ज्योतिषाला विचारून काय उपयोग? तुमचे भविष्य दिल्लीतील मायबाप ठरवितात, उद्धव ठाकरे यांची सडकून टिका..

Udhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात ठाकरी बाणा दाखविला..

Udhav Thackeray : ज्योतिषाला विचारून काय उपयोग? तुमचे भविष्य दिल्लीतील मायबाप ठरवितात, उद्धव ठाकरे यांची सडकून टिका..
ठाकरे यांचा हल्लाबोलImage Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Nov 26, 2022 | 11:41 PM
Share

बुलढाणा : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी बुलढाण्यातून खास ठाकरी शैलीतून राज्य सरकारचा समाचार घेतला. सरकारवर चौफेर टिका करत त्यांनी जाब विचारला. हे सरकार आश्वासनांची खैरात करणारं आहे, पण प्रत्यक्षात कोणाच्याच पदरात काहीच पडणार नसल्याचे, सांगायला ते विसरले नाहीत. मुख्यमंत्र्यांचा दैववादाच्या मुद्यावर त्यांनी खास ठाकरी शैलीत समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , फुटलेले आमदार आणि सरकारी धोरणे यावर ठाकरे तुटून पडले.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतःचा हात दाखवायला गेले होते. आज ते कामाख्या देवीचा नवस फेडायला गेले आहेत. ज्यांना स्वतःचे भविष्य माहित नाही, ते आपलं काय भविष्य ठरविणार अशी घणाघाती टिका ठाकरे यांनी केली. त्यांनी ज्योतिष्याकडे हात दाखविल्याबद्दल मुख्यमंत्र्यावर जोरदार हल्लाबोल चढविला.

मुख्यमंत्र्यांची हात की सफाई आम्ही पाहिलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राने ती पाहिलेली असल्याचा टोमणा शिंदेंना त्यांनी लगावला. शिंदेंनी शिवसेनेतील 40 आमदार फोडल्याबाबत ठाकरे यांनी त्यांच्यावर तोंडसूख घेतले. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवरही त्यांनी टिका केली.

तुमचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला कशाला विचारता, ते भविष्य, तुमचे माय-बाप दिल्लीत बसले आहेत, त्यांच्या हाती असल्याचा टोला, ठाकरे यांनी शिंदे यांना लगावला. शिंदे सरकारमागे दिल्लीश्वराचा हात आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर राज्य सरकारचा कारभार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

सध्याचं राज्यातील सरकार केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप त्यांनी चिखली येथील जाहीर सभेत केला. केंद्राच्या तालावर हे सरकार काम करत आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर सत्तेतून बाहेर पडल्याची शेखी मिरवत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.