AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्वारंटाईन सेंटर, कोविड रुग्णालयातील महिला अत्याचारांबाबत SOP जारी, चित्रा वाघ यांनी वाचला SOP तील त्रुटींचा पाढा

सरकारकडून कोविड सेंटर, रुग्णालयातील महिला अत्याचाराबाबत SOP जारी करण्यात आली आहे. मात्र, या SOPतील त्रुटींचा पाढाच चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाचलाय.

क्वारंटाईन सेंटर, कोविड रुग्णालयातील महिला अत्याचारांबाबत SOP जारी, चित्रा वाघ यांनी वाचला SOP तील त्रुटींचा पाढा
भाजप नेत्या चित्रा वाघ
| Updated on: May 19, 2021 | 7:33 PM
Share

मुंबई : कोरोना काळात अनेक राज्यात कोविड सेंटर किंवा रुग्णालयात महिलांवर बलात्कार आणि विनयभंगाच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यावर सरकारने मानक कार्यप्रमाणी (SOP)जारी करण्याची मागणी विविध स्तरातून होत होती. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही सातत्याने याबाबत ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर सरकारकडून कोविड सेंटर, रुग्णालयातील महिला अत्याचाराबाबत SOP जारी करण्यात आली आहे. मात्र, या SOPतील त्रुटींचा पाढाच चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाचलाय. (SOP on safety of female patients at covid Hospital, Chitra Wagh pointed out the error)

कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी SOP तयार करण्याच्या अनुषंगाने सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून 5 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. त्यात एकूण 16 मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, या SOP मध्ये चित्रा वाघ यांनी काही त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यात एकूण 5 त्रुटी वाघ यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी निदर्शनास आणलेल्या त्रुटी

1. संपूर्ण SoP ची अंमलबजावणी करून घेणारा स्थानिक प्रशासनातील अधिकारी निश्चित करण्यात आलेला नाही.

2. तक्रार निवारण समितीमध्ये कोण असावे याविषयी संदिग्धता आहे.

3. तक्रार निवारणाची पद्धत निश्चित केलेली नाही पीडित महिलेची तक्रार निकालात काढून आवश्यक ती पुढील कारवाई (उदा.पोलीस तक्रार) करण्यापर्यंतची कालमर्यादा आखून दिलेली नाही

4. तक्रार निवारण समितीकडे तक्रार पडून राहिली तर समितीचा उपयोग काय?

6. संपूर्ण SOP मध्ये केवळ ‘लक्ष द्यावे’ ‘दक्षता बाळगावी’असे शब्द लिहिले आहेत पण निष्काळजीपणा झाला तर त्यासाठी जबाबदार कोण हे सांगितलेले नाही.

अजित पवारांची 4 मार्च रोजी घोषणा

राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोव्हिड सेंटर्ससाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 मार्च रोजी विधानसभेत केली होती. त्यानंतर अखेर मे महिन्यात ही एसओपी जारी करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतल्याचं त्यावेळी अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, त्यानंतरही राज्यात काही ठिकाणी कोविड सेंटर आणि रुग्णालयात महिला रुग्णावर बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना समोर आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना मोठा दिलासा, उपचाराचा सर्व खर्च म. फुले जनआरोग्य योजनेतून होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस, स्तनपान करणाऱ्या महिलाही लस घेऊ शकतात, नव्या गाईडलाईन्स जारी

SOP on safety of female patients at covid Hospital, Chitra Wagh pointed out the error

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.