भाजपातर्फे 21 जूनला राज्यभरात योग शिबिरांचं आयोजन, तर 25 जूनला आणीबाणी विरोधात काळा दिवस पाळणार

राज्यात 2 हजार 700 पेक्षा जास्त ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलीय. या कार्यक्रमात राज्यभरात 1 कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी होतील, अशी माहितीही उपाध्ये यांनी दिली आहे.

भाजपातर्फे 21 जूनला राज्यभरात योग शिबिरांचं आयोजन, तर 25 जूनला आणीबाणी विरोधात काळा दिवस पाळणार
भाजपकडून राज्यभरात योग शिबिरांचे आयोजन
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 6:06 PM

मुंबई : 21 जून रोजी योगि दिनानिमित्त भाजपकडून राज्यभरात योग शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. राज्यात 2 हजार 700 पेक्षा जास्त ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलीय. या कार्यक्रमात राज्यभरात 1 कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी होतील, अशी माहितीही उपाध्ये यांनी दिली आहे. तर 25 जून रोजी भाजपकडून आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार आहे. त्या दिवशी भाजपकडून राज्यभरात पत्रकार परिषदा आणि अन्य माध्यमातून आणीबाणीच्या जखमांची जाणीव समाजाला करुन दिली जाणार असल्याचं उपाध्ये यांनी सांगितलं. (BJP to organize statewide yoga camps on June 21)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील 2 हजार 700 पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना पटवून दिले जाणार आहे. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेट भाषण केलं होतं. त्यावेळी योग त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

’25 जून आणीबाणी विरोधातील काळा दिवस’

दुसरीकडे भाजपकडून 25 जून हा आणीबाणी विरोधातील काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ‘काळे पर्व’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीद्वारे काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली. आणीबाणी काळात सरकारी यंत्रणेकडून झालेल्या अत्याचार आणि दडपशाहीमुळे या काळात देशभर भयाचं असुरक्षिततेचं सावट निर्माण झालं होतं. वृत्तपत्रांतील बातम्या, लेख यांच्यावर सेन्सॉरशिप लादली गेली होती.  या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी 25 जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार आहे. त्या दिवशी राज्यात जिल्हा स्तरावर भाजपच्या वतीने व्हिडिओ कॉन्फऱन्स, पत्रकार परिषदा आणि समाज माध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांच्या जाणीवा समाजास करून देण्यात येतील, अशी माहिती उपाध्ये यांनी दिलीय.

‘योग दिन हा वैश्विक सहमतीचे प्रतीक’

योग शिबिरांमध्येही पक्षाचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. योगविद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी सहभागी होणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व सर्वजण योग शिबिरातील किंवा वैयक्तिक योगसाधनेची छायाचित्रे व व्हिडियो समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करणार आहेत.  योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन म्हणून सिद्ध झाले आहे. भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास 200 देशांनीही स्वीकारली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व मनाचे सामर्थ्य वाढविणे यांसाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी जगभर योग दिन साजरा व्हावा असा प्रस्ताव मांडला. योग दिन हा अलीकडच्या काळातील वैश्विक सहमतीचे प्रतीक ठरला असल्याने, योगाभ्यासाचा जनक असलेल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याचंही उपाध्ये म्हणाले.

इतर बातम्या :

Video : अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन, मुसळधार पाऊस सुरु असल्याने ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारला

भुजबळ, पटोले, वडेट्टीवार हे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार; आशिष शेलारांची खोचक टीका

BJP to organize statewide yoga camps on June 21

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.