'पिवळ्या साडी'वाल्या पोलिंग अधिकार्‍याची यंदा 'त्या' मतदारसंघात 'गुलाबी' हजेरी

रिना द्विवेदी पोलिंग बूथवर ईव्हीएम किट घेण्यासाठी पोहचल्या होत्या, त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.

'पिवळ्या साडी'वाल्या पोलिंग अधिकार्‍याची यंदा 'त्या' मतदारसंघात 'गुलाबी' हजेरी

लखनऊ : लोकसभा निवडणुकांच्या वेळी पिवळ्या साडीतील पोलिंग बूथ अधिकारी महिलेचे फोटो (Yellow Saree Rina Dwivedi Lucknow) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्या रिना द्विवेदी यंदाही लखनऊमध्ये पोटनिवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर हजर होत्या. यावेळी त्यांचे गुलाबी साडीतील फोटो नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहेत.

रिना द्विवेदी या लखनऊच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत. त्या लखनौमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ऑन ड्युटी तैनात होत्या. त्यांची नियुक्ती कृष्णा नगर येथील एका कॉलेजमध्ये होती. उत्तर प्रदेशातील अकरा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.

रिना तैनात असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. विशेष म्हणजे इतर पोलिंग बूथवर शुकशुकाट असताना द्विवेदींच्या मतदान केंद्रावर मात्र तोबा गर्दी झाल्याचं म्हटलं जातं. रिना द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार एक हजार मतदान असलेल्या बूथवर दुपारपर्यंत 300 जणांनी मतदान केलं होतं.

देशभरात फोटो व्हायरल होणारी ही पिवळ्या साडीतील महिला कोण?

रविवारी सकाळी जेव्हा रिना पोलिंग बूथवर ईव्हीएम किट घेण्यासाठी पोहचल्या होत्या, त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. मी सुरुवातीपासूनच लेटेस्ट फॅशन फॉलो करते, मागच्या निवडणुकीच्या वेळी माझे पिवळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले आणि सगळे मला पिवळ्या साडीवाली मॅडम (Yellow Saree Rina Dwivedi Lucknow) म्हणून ओळखू लागले, असं रिना सांगतात.

पिवळ्या साडीतील महिला अधिकाऱ्यानंतर निळ्या ड्रेसमधील अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल

लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रसिद्धीस आल्यानंतर रिना यांच्या डान्सचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. हरियाणाची गायिका सपना चौधरी हिच्या ‘तेरी अख्या का यो काजल’ या गाण्यावर रिना डान्स करताना पाहायला मिळाल्या होत्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *