योगी सरकारचा प्रताप; शायरांची नावे बदलून नव्या वादाला तोंड…अकबर इलाहाबादींचे केले प्रयागराजी

प्रसिद्ध हिंदी कथाकार राजेंद्र कुमार यांनी शायरांची नावे बदलण्याच्या खोडसाळपणावर आक्षेप नोंदवत हा मुर्खपणाचा कळस असल्याची टीका केली आहे.

योगी सरकारचा प्रताप; शायरांची नावे बदलून नव्या वादाला तोंड...अकबर इलाहाबादींचे केले प्रयागराजी
प्रसिद्ध शायर अकबर इलाहाबादी.
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 11:02 AM

लखनौः जे न देखे रवी, ते देखे कवी म्हणतात…मात्र, योगी सरकारची दूरदृष्टी इतकी पल्याडची आहे की, त्यांनी चक्क या कवी आणि शायरांचीच नावे एका झटक्यात बदलून नव्याच वादाला तोंड फोडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाचा स्तर इतका घसरावा, याबद्दल साहित्य वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी हा सरकारच्या मुर्खपणाचा कळस असल्याची टीका केली आहे.

प्रकरण नेमके काय?

योगी सरकारने अलाहाबादचे नामकरण केले. ते आता प्रयागराज म्हणून ओळखले जाते. शायरीच्या दुनियेत जगभर प्रसिद्ध असणारे नाव अकबर इलाहाबादी. अकबर इलाहाबादी हे अलाहाबादचे. त्यामुळे ते आडनाव म्हणून इलाहाबादी हा शब्द लावत. मात्र, आता शहराचे नाव बदलले म्हणून या सुप्रसिद्ध शायराचे आडनाव बदलण्याचा खोडसाळपणा प्रशासनाने केला आहे. त्यांचे नाव अकबर इलाहाबादी ऐवजी आता अकबर प्रयागराज असे करण्यात आले आहे. इतकेच नाही, तर राशिद इलाहाबादी, तेग इलाहाबादी यांची नावेही बदलण्यात आली आहेत. त्यांच्या नावातील इलाहाबादी शब्दांऐवजी तिथे प्रयागराज असा उल्लेख करण्यात आला आहे.

वेबासाईटवरही नावे बदलली

उत्तर प्रदेशची ओळख गंगाजमनी तहजीबचा सुंदर मिलाफ अशी आहे. मात्र, इथे योगी सरकारच्या पावलाच्या पुढे पाऊल टाकण्याचे काम इथले शिक्षण विभाग करताना दिसत आहे. त्यांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर ही बदलेली नावे झळकावली आहेत. त्यामुळे अलम शायरीच्या दुनियेत जगभरात वादळ उठले आहे. उच्चशिक्षण आयोगाने आपल्या वेबसाईटवर ‘अबाऊट अस’ नावाच्या कॉलममध्ये अलाहाबाद हा सबकॉलम दिलाय. तिथे क्लिक करताच शहराचा इतिहास सांगणारे पेज समोर येते. त्यावर शायरांच्या नावांचा उल्लेख इलाहाबादी ऐवजी प्रयागराजी असा केला आहे. अकबर प्रयागराजी, राशिद प्रयागराजी, तेग प्रयागराजी…या नव्या नावामुळे साहित्य वर्तुळातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुर्खपणाचा कळस…

प्रसिद्ध हिंदी कथाकार राजेंद्र कुमार यांनी या खोडसाळपणावर आक्षेप नोंदवत हा मुर्खपणाचा कळस असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी संताप व्यक्त केला. शायराचे नाव ही त्यांची कालातीत ओळख असते. त्याचे नाव बदलने अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर प्रसिद्ध शायर श्लेष गौतम यांनी अकबर इलाहाबादी यांची ओळख पुसण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशा शब्दांत योगी सरकारवर टीका केली आहे.

इतर बातम्याः

Video| माणुसकीला काळीमा, स्मशानातच सरणाची लाकडे घेऊन तुंबळ हाणामारी; नाशिकमध्ये कवी पाठारेंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी आक्रीत

रिलायन्समध्ये होणार नेतृत्वबदल; मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?

पाकिस्तानचा मजनू, बॉर्डर पार करुन मुंबईत, लैला नेमकी कुठं गेली? सोशल मीडियावरची दिवानी लव्ह स्टोरी

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.