ZP Election : झेडपीत तुमचा जुना मित्र शिवसेनेला तोटा होतोय? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

नागपूर जिल्हा परिषदेत एक जागा कमी झाली पण पंचायत समितीच जास्त यश मिळालं. राज्यात तीन पक्षांची स्पेस कमी होताना दिसत असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. आता याचा विचार शिवसेनेनं करायचा आहे. यापुढेही आम्ही सगळी स्पेस अशीच खात राहणार, असा इशाराही फडणवीसांनी शिवसेनेला दिलाय.

ZP Election : झेडपीत तुमचा जुना मित्र शिवसेनेला तोटा होतोय? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
DEVENDRA FADNAVIS


मुंबई : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल आज लागले. त्यात एकट्या भाजपनं महाविकास आघाडीला जोरदार टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्याबाबत पत्रकारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावत एक सल्लाही दिला आहे. (Devendra Fadnavis advises Shivsena and Criticizes Mahavikas Aghadi Over Farmers Issue)

‘आता विचार शिवसेनेनं करायचा आहे’

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाढत आहे, हे या निवडणुकीवरुन समजतं. शिवसेना रसातळाला जात आहे आणि भाजप एक नंबरचा पक्ष होत असल्याचं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी जनतेचेही आभार मानले आहेत. आमचे स्थानिक नेतेच नेतृत्व करतील, मोठे नेते प्रचाराला जाणार नाहीत. नागपूर जिल्हा परिषदेत एक जागा कमी झाली पण पंचायत समितीच जास्त यश मिळालं. राज्यात तीन पक्षांची स्पेस कमी होताना दिसत असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. आता याचा विचार शिवसेनेनं करायचा आहे. यापुढेही आम्ही सगळी स्पेस अशीच खात राहणार, असा इशाराही फडणवीसांनी शिवसेनेला दिलाय.

त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी बोलावं- फडणवीस

कॅबिनेट बैठकीत लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का? त्यांचे कैवारी ते झाले नाहीत. अद्याप मदतीचा निर्णय घेतला नाही, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भाजप आंदोलन करेल. उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार काम करेल. इथे शेतकरी मरत आहेत. त्यावर हे काही बोलत नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केलीय.

‘महाविकास आघाडीची महाराष्ट्र बंदची हाक’

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला.  हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही. मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबतदेखील आम्ही बोलणार आहोत की त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

नागपूरमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या, फडणवीस म्हणतात, पंचायत समितीत वाढल्या, वाचा आणखी काय म्हणाले?

Maharashtra Band : महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा, येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद!

Devendra Fadnavis advises Shivsena and Criticizes Mahavikas Aghadi Over Farmers Issue

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI