Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळ घोंघावलं, पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

या चक्रीवादळाचे पडसाद आता पुण्यातही उमटत आहे. पुणे शहरात अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरु आहे.

Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळ घोंघावलं, पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

पुणे : ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या (Cyclone Nisarga Effect In Pune) किनाऱ्यावर येऊन धडकलं आहे. या चक्रीवादळाचे पडसाद आता पुण्यातही उमटत आहे. पुणे शहरात अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे हवामान विभागाने पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता (Cyclone Nisarga Effect In Pune) वर्तवली होती.

पुण्यात ताशी 60 ते 70 किमी वेगाने वारे वहातील. पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसेच, आज रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात चालत्या चारचाकी वाहनावर झाड कोसळलं

वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसल्याने जुनी घरं, झाडं, विजेचे खांब यांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामात विभागाने वर्तवली होती. अशातच पुण्यातील विमानतळ रस्त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर एका चालत्या चारचाकी वाहनावर झाड कोसळले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. चारचाकी वाहनात दोन जण होते.

तर पुण्यात विविध भागात झाडपडीच्या वीस घटना घडल्या आहेत. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा प्रकोप पुढील तीन तास मुंबई, रायगड, रत्नागिरी या कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना जाणवणार आहे.

पुणे जिल्ह्यातही नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे (Cyclone Nisarga Effect In Pune).

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, जुना पुणे- मुंबई रस्ता, ताम्हिनी घाटात प्रशासनाची विशेष तयारी

निसर्ग चक्रीवादळमुळे निर्माण होणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, जुना पुणे- मुंबई रस्ता, ताम्हिनी घाट, वरंधा घाट आदी ठिकाणी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

या भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच, अनेक ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र असल्यामुळे वाहतूक टाळण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

वादळ आणि पावसामुळे घाटात दरड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलिसांनी अशा प्रत्येक ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टीम तैनात केल्या आहेत. तसेच, राज्य रस्ते विकास महामंडळानेही (एमएसआरडीसी) पथकं तैनात केली आहेत.

दरड कोसळल्यास ती बाजूला करण्यासाठी पुरेशा संख्येने जेसीबी, ट्रेलर, रुग्णवाहिका आणि संबंधित मनुष्यबळ सज्ज असल्याची माहिती, महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

एक्स्प्रेस-वेवर 30 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी विविध ठिकाणी तैनात आहेत. जुना पुणे-मुंबई मार्ग येथेही विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमृतानंजन पुलाजवळ दोन किलोमीटरच्या रस्त्यावर पोलीस आणि एमएसआरडीसीच्या पथकांचे विशेष लक्ष आहे. एक्स्प्रेस-वेवर वाहतूक सुरु ठेवण्यात आली असली तरी नागरिकांनी आवश्यकता असेल तरच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनारपट्टीवर धडकलं

अलिबाग किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकलं आहे. या किनारपट्टीवर सध्या ताशी 100 किलोमीटर वेगाने चक्रीवादळ घोंगावत आहे. या वादळाने नारळाची आणि इतर झाडं अनेक ठिकाणी भुईसपाट झाली आहे. त्याचबरोबर लाटाही मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर धडकत आहे. आकाश पूर्ण पावसानं व्यापलं असून समुद्र परिसरात काळोख पसरला आहे. सोसाट्याच्या वारा, लाटा आणि पावसाचं रौद्र रुप किनारपट्टीवर पाहायला मिळत आहे.

Cyclone Nisarga Effect In Pune

संबंधित बातम्या :

Cyclone Nisarga | वादळ दिशाबदलाची शक्यता नाही, तासाभरात चक्रीवादळ ठाणे-मुंबईच्या दिशेने : हवामान विभाग

Cyclone Nisarga | नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाट रस्त्यात दरड कोसळली

VIDEO | रत्नागिरीत मिऱ्या समुद्रावर भरकटलेले जहाज संरक्षक भिंतीवर धडकले

Nisarga Cyclone : मुंबई शहराचे पालकमंत्री मध्यरात्रीही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मढ-भाटीत मच्छिमारांची भेट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *