पुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे (Five Corona Patient successfully recover ). पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणखी तिघांची प्रकृती सुधारली असून त्यांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Five Corona Patient successfully recover, पुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे (Five Corona Patient successfully recover ). पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणखी तिघांची प्रकृती सुधारली असून त्यांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना डिस्चार्ज देण्याअगोदर एका दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे नायडू रुग्णालयातून आज पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला (Five Corona Patient successfully recover ).

तीनही रुग्ण पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याच्या सहवासातील आहेत. एक या दाम्पत्याची मुलगी, दुसरा या दाम्पत्याच्या टॅक्सीचा चालक आणि तिसरा यांचा सहप्रवासी आहे. तिघांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी टेस्ट एनआयव्हीकडून पुन्हा निगेटिव्ह आली. त्यामुळे या तीनही कोरोनामुक्त नागरिकांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला.

तिघांनाही 10 मार्चला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 14 दिवसांनी त्यांची पहिली टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुसरी टेस्ट निगेटीव आली. मात्र घरी सोडल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत असताना पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याने रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांचे पत्रामार्फत आभार मानले.

पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याचे पत्र

सप्रेम नमस्कार,

नायडू आणि ससून रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स, स्टाफ आणि अधिष्ट,

मी आणि माझी पत्नी नायडू रुग्णालयात 9 मार्च 2020 रोजी टेस्टसाठी अॅडमीट झालो होतो. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आम्ही रुग्णालयात दाखल झालो. आम्ही डॉक्टरांच्या सहाय्यानुसार नियमांचे तंतोतंत पालन केले आणि 14 दिवस पूर्ण झाल्यावर 15 व्या दिवशी आणि 16 व्या दिवशी टेस्ट घेतली. या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्यामुळे आम्हाला दोघांना घरी सोडत आहेत. आम्ही या कोरोनापासून मुक्त निरोगी झालो आणि बाकीचे पेशंटही बरे होणार याची खात्री आहे. पण सर्वांनी नियमांचे पालन करावे. माननीय पंतप्रधान, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि इतर मेडिकल स्टाफ आणि सर्व सरकारी अधिकारी ज्या सूचना करतात त्याचे पालन केले तर या रोगाला हटवू शकता.

आम्ही पुन्हा एकदा नायडू रुग्णालयाचे सर्व डॉक्टर, स्टाफ, ससून रुग्णालयातील सर्व डॉक्टर, स्टाफ यांचे आणि पुणे मनपा सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आरोग्य सेवा सर्वांना मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.

मुंबईतही 8 जणांना डिस्चार्ज 

मुंबईतही कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर चौघांनाही लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. डिस्चार्ज मिळालेल्या आठही रुग्णांना पुढचे 14 होम क्लारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता

बीडमध्ये संचारबंदीवरुन पोलीस-नागरिकांमध्ये हाणामारी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *