पुलवामा हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा? लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणतात...

पुणे : लोकभावना जरी तीव्र असल्या तरी घाईत कुठलाही निर्णय घेता येणार नाही, शत्रूला गाफील ठेवून कारवाई करण्याची गरज असून, भारताला पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करता येणार नाही, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी मांडले. निंभोरकर यांनी 2016 साली सर्जिकल ट्राईक्स यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर नेमके काय म्हणाले? …

पुलवामा हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा? लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणतात...

पुणे : लोकभावना जरी तीव्र असल्या तरी घाईत कुठलाही निर्णय घेता येणार नाही, शत्रूला गाफील ठेवून कारवाई करण्याची गरज असून, भारताला पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करता येणार नाही, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी मांडले. निंभोरकर यांनी 2016 साली सर्जिकल ट्राईक्स यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर नेमके काय म्हणाले?

“लोकभावना जरी तीव्र असल्या तरी घाईत कुठलाही निर्णय घेता येणार नाही, शत्रूला गाफील ठेवून कारवाई करण्याची गरज असून, भारताला पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करता येणार नाही.” असे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर म्हणाले. तसेच, बदला घेण्याची वेळ मात्र नक्की आली असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचंही निंभोरकर म्हणाले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा येण्यासाठी स्थानिकांची नक्कीच मदत असणार आहे. तसेच हे काही गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे असं म्हणता  येणार नाही, असंही निंभोरकर यांनी यावेळी सांगितले.

पाकिस्तानचा मोस्ट फेवरबेल नेशनचा दर्जा काढून पाकिस्तानला काही फरक पडणार नाहीय. त्यांच्याविरोधात आणखी काय कारवाई करता येईल, यावर विचार होण्याची गरज आहे. मात्र बदला जरुर घ्यावा, असं लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी म्हटलं.

पुलवामा हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान होते.

पुलवामा हल्ल्याचा भारताने बदला घ्यावा, अशी जनभावना प्रकट होते आहे. त्यामुळे सरकार काय पावलं उचलतं आहे, याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *