साध्वी प्रज्ञाविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातून 200 सामाजिक कार्यकर्ते भोपाळमध्ये जाणार

पुणे : मुंबईवरील 26/11 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्याविरोधात महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील 200 हून अधिक सामाजिक कार्यकर्ते भोपाळ येथे जाऊन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या विरोधात प्रचार करणार आहेत. यासंदर्भात माजी पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी माहिती दिली. […]

साध्वी प्रज्ञाविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातून 200 सामाजिक कार्यकर्ते भोपाळमध्ये जाणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

पुणे : मुंबईवरील 26/11 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्याविरोधात महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील 200 हून अधिक सामाजिक कार्यकर्ते भोपाळ येथे जाऊन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या विरोधात प्रचार करणार आहेत. यासंदर्भात माजी पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी माहिती दिली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला जामीन मिळाल्यानंतर भाजपने तिला मध्य प्रदेशातील भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली. यानंतर साध्वी प्रज्ञा सिह वारंवार वादग्रस्त विधान करत आहे. याचा निषेध सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.

अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली

महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिचा निषेध करुनच थांबले नाहीत, तर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते 30 एप्रिलला भोपाळला जाणार आहेत आणि तिथे जाऊन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्याविरोधात प्रचार करणार आहेत. या प्रचारात माजी पोलीस महानिरीक्षक सुरेख खोपडे हे देखील सहभागी होणार आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने काय म्हटलं होतं?

भाजपची भोपाळची लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूरने संतापजनक वक्तव्य केलं होतं. मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं चीड आणणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केलं होतं. भोपाळ लोकसभेची भाजपची उमेदवार असलेली साध्वी प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं, असं साध्वी म्हणाली.

एका सभेत साध्वी म्हणाली, “तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितलं होतं. मात्र हेमंत करकरेंनी नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असं म्हटलं होतं”

हेमंत करकरेंची ही कूटनीती होती, देशद्रोह होता, धर्मविरोध होता. ते मला विचारत होते मला सत्यासाठी देवाकडे जावं लागेल का, तेव्हा मी त्यांना म्हणाले तुम्हाला वाटत असेल तर जा, असं साध्वीने सांगितलं.

तुझा सर्वनाश होईल, असं मी म्हटलं होतं. त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. ज्यावेळी मी गेले तेव्हापासून सूतक लागलं होतं, पण दहशतवाद्यांना त्यांना मारलं तेव्हा माझं सूतक संपलं, असं संतापजनक विधान साध्वी प्रज्ञाने केलं.

साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरेंची तुलना कंसाशी केली. कंसाचा वध जसा श्रीकृष्णाने केला, तसंच देवाने वध केला, असं साध्वी म्हणाली.

भगवान राम कालात रावण झाला, त्याचा अंत संन्यासांद्वारे झाला. द्वापारयुगात कंस झाला तेव्हा त्याचा अंत करण्यासाठी श्रीकृष्ण आला, असं साध्वी बरळली.

हेमंत करकरे कोण होते?

हेमंत करकरे हे दहशतवादविरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी होते. मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले होते.

याशिवाय हेमंत करकरे मालेगाव साखळी बॉम्ब स्फोटाचे तपास अधिकारी होते. याच खटल्यात साध्वी प्रज्ञा आरोपी होती.

हेमंत करकरे यांचा जन्म 12 डिसेंबर 1954 रोजी झाला होता. 1982 मध्ये ते आयपीएस अधिकारी झाले. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस सहआयुक्त पद भूषवणारे करकरे हे नंतर दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख बनले.

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांना भारत सरकारने अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.