AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कानून के हाथ लंबे होते है | तडीपार आरोपींवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचा हायटेक फंडा

तडीपार आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी हायटेक फंडा शोधून काढला आहे (Pune police use Extra application).

कानून के हाथ लंबे होते है | तडीपार आरोपींवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचा हायटेक फंडा
| Updated on: Jun 14, 2020 | 11:13 AM
Share

पुणे : लॉकडाऊनदरम्यान गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे (Pune police use Extra application). काही तडीपार गुंड नियमांचे उल्लंघन करुन शहरात प्रवेश करत असल्याचे पुणे पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. अखेर या तडीपार आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी हायटेक फंडा शोधून काढला आहे. पोलिसांना आता एक्स्ट्रा मोबाईल ॲप्लिकेशन माध्यमातून आरोपीचा सुगावा लागणार आहे (Pune police use Extra application).

पुणे पोलीस आता ॲप ट्रॅकिंग सिस्टिमप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवणार आहेत. त्यामुळे हद्दपार झालेल्या कुख्यात गुंडांनी मूळ गावी येऊन गुन्हेगारी कारवाया केल्यास पोलिसांना तातडीने माहिती मिळणार आहे.

तडीपार आरोपींवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी एक्स्ट्रा ॲप्लिकेशनचा वापर सुरु केला आहे. हडपसर परिसरातील विराज यादव या आरोपीच्या मोबाइलमध्ये ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन त्याच्यावरती वॉच ठेवला जात आहे.

लॉकडाऊनदरम्यान सायबर गुन्ह्यांतही वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार आणि समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचं याअगोदरही समोर आलं आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने अशा लोकांविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील सायबर गुन्हेगारींवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

ऑनलाइन फसवणूक, सावध रहा

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसअॅप मेसेजेस फिरत आहेत. या मेसेजेसमध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी किंवा कोणत्याही वेबसेरीजचे सब्सक्रिप्शन स्वस्तात आहे खालील लिंकवर क्लिक करा, असा मजकूर असतो आणि एक लिंक दिली असते. आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये. कारण सदर लिंक्स आणि मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे.

तुम्ही जर त्या लिंकवर क्लीक केले तर एक फॉर्म उघडतो ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स, पासवर्डस, डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती, पिन क्रमांक सर्व विचारले जाते. तुम्ही ही सर्व माहिती दिली की, एक OTP येतो आणि तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो. पलीकडून संभाषण करणारी व्यक्ती आपण त्या कंपनीमधूनच बोलतोय असा आभास निर्माण करून तो OTP , तुमच्याकडून काढून घेते आणि काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा sms येतो की तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये .तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी आणि www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website )पण नोंद करावी, असं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

तुझं वागणं बरोबर नाही, चारित्र्यावरुन संशय, पती, सासू, दिराकडून विवाहितेचं मुंडन

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.