Exclusive: 'महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे', रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.

Exclusive: 'महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे', रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच ते जे बोलत आहेत ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे की भाजपच्यावतीने बोलत आहेत असाही प्रश्न विचारला. यावेळी रोहित पवार यांनी महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे असल्याचा आरोपही केला. तसेच या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली (Rohit Pawar comment on Narayan Rane and Mahaportal Corruption demand SIT inquiry ).

रोहित पवार म्हणाले, “नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत जी टीका केली ती त्यांची व्यक्तिगत मतं आहेत. त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते जे बोलत आहेत ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे की भाजपच्यावतीने बोलत आहेत? विरोधक सरकार पडावं याकडेच जास्त लक्ष देत आहेत. विरोधक काय बोलतात त्याकडे लक्ष देण्यापेक्षा ते नेमकं कसं वागतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांनी सुशांत आत्महत्याप्रकरणी एम्सच्या रिपोर्टवर घेतलेला आक्षेप चुकीचं आहे. हे राजकीय वक्तव्य आहे.”

“केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे पैसे दिले नाहीत. विरोधी पक्षाने याबाबत केंद्राला किती पत्रं दिलेत? ज्या विश्वासावर जीएसटी आणला गेला, त्या विश्वासालाच तडा गेलाय. जर जीएसटी प्रकरणी विश्वासघात होत असेल, तर हा टॅक्स का पाहिजे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो,” असंही रोहित पवार यांनी म्हटलं.

‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’

यावेळी रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात महापोर्टलमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे मध्य प्रदेशमधील व्यापमशी लागेबांधे असल्याचा आरोप केला.ते म्हणाले, “महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे आहेत. त्यामुळे यामधील भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करावी.”

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. त्यामध्ये राजकारण आणू नये, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं. राम शिंदे हे जसं बोलतायत त्यावरून यांना व्हिजन नसल्याचं दिसतंय, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीसांचा सन्मान राखा, त्यांच्याविषयी वाईटसाईट बोलू नका; रोहित पवारांनी ट्रोलिंग करणाऱ्यांचे कान उपटले

जेसीबीतून गुलालाची वर्षपूर्ती, पिण्याचे पाणी ते डिजीटल शिक्षण, रोहित पवारांकडून रिपोर्ट कार्ड सादर

प्रचंड कष्ट, लोकांचं प्रेम आणि शरद पवार या गोष्टी कधीही वेगळ्या न करता येण्याजोग्या : रोहित पवार

Rohit Pawar comment on Narayan Rane and Mahaportal Corruption demand SIT inquiry

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *