पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, आजपासून 'या' गोष्टी सुरु होणार

गेले दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ देशात लॉकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यत आला (Shops Open in Pune) आहे.

पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, आजपासून 'या' गोष्टी सुरु होणार

पुणे : गेले दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ देशात लॉकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यत आला (Shops Open in Pune) आहे. पण आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात पुणे शहरात सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. पाचव्या टप्प्यात पुण्यात उद्याने, कॅब, व्यापारी क्षेत्र, खाजगी कार्यालयं, मंडई, बाजारपेठा तीन टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले (Shops Open in Pune) आहे.

नवीन आदेशात 65 ऐवजी 66 प्रतिबंधित क्षेत्र झाले आहेत. मात्र अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. आजपासून पुण्यात उद्याने पहाटे 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. महापालिका नवीन आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व दुकाने सुरू होणार आहेत.

पुण्यात 8 जूनपासून 10 टक्के मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडणार आहेत. उदाहरणार्थ वकील, सीए यांची कार्यालये उघडण्यात येणार. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहणार आहेत.

पुण्यात हॉटेल, मॉल, सिनेमागृह, मंदिरे बंदच राहणार आहेत. तर इतर सर्व दुकानं 9 ते 5 वेळेत सुरु राहणार आहे. तुळशीबाग, हॉंगकॉंग,मंडई लेन पी 1, पी 2 नुसार 5 जूनपासून सुरू होणार.

पुण्यातील बांधकाम व्यवसायही सुरु होणार आहे. यादरम्यान सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown 5.0 | सायकलिंग, रनिंग, वॉकिंगला परवानगी, लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु काय बंद?

Lockdown 5.0 | सायकलिंग, रनिंग, वॉकिंगला परवानगी, लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु काय बंद?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *