डेक्कन, प्रगती, कोयना, सह्याद्रीसह 9 एक्स्प्रेस 15 दिवसांसाठी रद्द

मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे हा प्रवास सुखकर करणाऱ्या रेल्वे गाड्या तब्बल 15 दिवसांसाठी रद्द करण्यात येत आहेत.

डेक्कन, प्रगती, कोयना, सह्याद्रीसह 9 एक्स्प्रेस 15 दिवसांसाठी रद्द

पुणे : मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे हा प्रवास सुखकर करणाऱ्या रेल्वे गाड्या तब्बल 15 दिवसांसाठी रद्द करण्यात येत आहेत. येत्या 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत या मार्गावर रेल्वे गाड्या चालवण्यात येणार नाहीत. कर्जत ते लोणावळादरम्यान दुरुस्तीच्या कारणास्तव हा महा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. 15 दिवस या मार्गावर गाड्या धावणार नसल्याने पुणे-मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल होणार आहेत.

कर्जत ते लोणावळा या दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी 15 दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द केल्या जात आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येत आहेत, अशी सूचना रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दररोज या मार्गावर शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. त्यातच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. यामध्ये नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यापारी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे 15 दिवस या मर्गावर रेल्वे धावणार नसल्याने या प्रवाशांचे हाल होतील. तसेच, एसटी बस आणि प्रायव्हेट गाड्यांकडे या प्रवाशांचा लोंढा वळल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

रद्द आणि मार्ग वळवण्यात आलेल्या गाड्यांची यादी

1) Deccan Queen Express डेक्कन एक्सप्रेस (11008/11007) : 26 जुलै ते 09 ऑगस्टपर्यंत रद्द

2) Pragati Express प्रगती एक्सप्रेस (12126/12125) : 26 जुलै ते 09 ऑगस्टपर्यंत रद्द

3)  Gandak Express  गण्डक एक्सप्रेस (11139/11140) : 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत रद्द

4) Koyna Express कोयना एक्सप्रेस (11029/11030) : 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत पुणे ते सीएसएमटीदरम्यान रद्द

5) Sahyadri Express सह्याद्री एक्सप्रेस (11023/11024) : 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत पुणे ते सीएसएमटीदरम्यान रद्द

6) Hubali-LTT Express हुबळी एलटीटी (17317/18) : 25 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत पुणे ते एलटीटी दरम्यान रद्द

7) Pune Bhusaval Express भुसावळ-पुणे-भुसावळ : दौंड-मनमाड मार्गे चालविण्यात येईल

8) Pune-Panvel  पुणे-पनवेल (पॅसेंजर) (51318/53317) : 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत पुणे ते पनवेलपर्यंत रद्द

9) Nanded-Panvel नांदेड-पनवेल (17614/17613) : 27 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत पुणे ते पनवेलपर्यंत रद्द

10) Panvel-Nanded पनवेल-नांदेड हॉलीडे स्पेशल (07618) : 28 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत पुणे ते पनवेलपर्यंत रद्द

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *